वैद्यकीय शिक्षण मंत्री शरण प्रकाश पाटील यांनी आज बेळगावातील बीम्स रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. या भेटीत त्यांनी बीम्स रुग्णालयातील रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस केली, तसेच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि कर्मचारी देण्याचे आश्वासन दिले.
राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री शरणप्रकाश पाटील यांनी बेळगावातील बीम्स रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णालयातील रुग्णांच्या आरोग्याची विचारपूस केली. रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री शरणप्रकाश पाटील म्हणाले की, 2017 मध्ये काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यावर सरकारने कलबुर्गी, बेळगाव, म्हैसूर येथे स्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्याचे काम पुढे नेले. बेळगावातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकामाकडे भाजप सरकारनेही दुर्लक्ष केले, त्यामुळे हॉस्पिटल पूर्ण होण्यास उशीर झाला.
बीम्स रुग्णालयातील अनागोंदी कारभाराबाबत बोलताना मंत्री म्हणाले की, बीम्स रुग्णालयाच्या डॉक्टरांची आज बैठक घेऊन सर्व डॉक्टरांना ताकीद देणार आहे. ड्युटीच्या वेळेत खासगी प्रॅक्टीस करणाऱ्या डॉक्टरांना याबाबत ताकीद देण्यात येईल. तरीही त्यांनी न ऐकल्यास, शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. बीम्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे पुरविण्यात येतील तसेच कर्मचाऱ्यांच्या तरतूदीबाबत चर्चा करू, नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधून देऊ.
यावेळी कर्नाटकाचे दिल्ली येथील प्रतिनिधी व विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी सांगितले की, बेळगाव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला मंजुरी मिळाली तेव्हा मी लोकसभेचा सदस्य होतो आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्याची विनंती मी सरकारला केली होती. आता या हॉस्पिटलचे काम पूर्ण झाले आहे त्याबद्दल मी मुख्यमंत्री सिद्दरामय्या व वैद्यकीय शिक्षण मंत्री शरणप्रकाश पाटील यांचे आभार मानतो. यावेळी बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ व अन्य उपस्थित होते.


Recent Comments