मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील झालेल्या मंत्र्याच्या ब्रेकफास्ट मीटिंगचे मला कोणतेही निमंत्रण मिळालेले नाही, वैद्यकीय मंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील यांनी स्पष्ट केले.
वैद्यकीय शिक्षण मंत्री शरणप्रकाश पाटील यांनी आज बेळगावातील बीम्स रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. या भेटीदरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री शरणप्रकाश पाटील म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील मंत्र्यांच्या ब्रेकफास्ट मीटिंगचे मला निमंत्रण मिळाले नाही. त्याशिवाय माझी प्रकृती ठीक नव्हती. प्रियांक खर्गे यांच्या विधानाचा प्रसारमाध्यमांनीच गैरअर्थ करून घेतला, माध्यमांसमोर येऊन त्यांनी मी मुख्यमंत्री होतो असे म्हटलेले नाही, माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना वारंवार प्रश्न विचारला, तेव्हा हायकमांडने सांगितले तर,
संधी मिळाली तर मीसुद्धा मुख्यमंत्री होऊ शकेन असे प्रियांक खर्गे म्हणाले आहेत असे शरणप्रकाश पाटील यांनी सांगितले. आमच्या सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, आम्ही एक आहोत, कोणत्याही आमदारांमध्ये नाराजी किंवा मतभेद नाही, मुख्यमंत्री बदलाबाबत कोणतीही चर्चा नाही. , तुम्ही मला हा प्रश्न विचारू नका, मी अशा प्रश्नांची उत्तरे देणारा माणूस नाही असे त्यांनी सांगितले. यावेळी विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी, बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ उपस्थित होते.


Recent Comments