Belagavi

स्टायलिश फर्निचरचे बेळगावात थाटात उदघाटन

Share

स्वप्नातील घराचे स्वप्न पूर्ण झाल्यावर त्याला सुशोभित करण्यासाठी लागणारे फर्निचर आता अत्यंत माफक दरात बेळगाव शहरामध्ये उपलब्ध झाले आहे . फक्त दीड लाख रुपयांचाप पॅकेजमध्ये दोन बेडरूम , हॉल किचनचे फर्निचर , “स्टायलिश बाजार ” फर्निचर अँड डेकोर ने उपलब्ध करून दिले आहे .

बेळगावकराना अत्यंत माफक दरात सर्व प्रकारचे फर्निचर आता “स्टायलिश बाजार ” फर्निचर अँड डेकोर ने उपलब्ध करून दिले आहे . बेळगावच्या कणबर्गी रोडवरील , इलाईट टॉवर या इमारतीमध्ये “स्टायलिश बाजार “या फर्निचर शोरुमचे आज दिमाखात उदघाटन करण्यात आले .

गेल्या २५ वर्षांपासून फर्निचरच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या रवींद्र सुतार आणि कुटुंबीयांनी आता संकेश्वर सह , बेळगावमध्ये आपली फर्निचरची शाखा सुरु केली आहे . शुक्रवारी मालुताई शंकर सुतार या आपल्या मातोश्रींच्या हस्ते फित कापून , रवींद्र सुतार आणि कुटुंबीयांनी या शोरुमचे उदघाटन केले . यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले . (फ्लो )
या उदघाटनाला उपस्थित असलेले अल्पसंख्याक विभागाचे माजी अध्यक्ष मुख्तार पठाण यांनी सांगितले कि आमच्या संकेश्वर येथील सर्वसामान्य कुटुंबातील रवींद्र सुतार यांनी फर्निचरची ही तिसरी शोरूम बेळगावमध्ये सुरु केली आहे . त्यांना मी यासाठी शुभेच्छा देतो . घर बांधल्यानंतर त्यासाठी फर्निचर महत्वाचे असते . रवींद्र सुतार यांनी अतिशय उत्तम दर्जाचे फर्निचर उपलब्ध करून दिले आहे . त्यांच्या या शोरूम ला एकदा अवश्य भेट द्या . तसेच त्यांच्या शोरूमचा राज्यभरात आणि देशभरात विस्तार होऊ देत अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या .

यावेळी “स्टायलिश बाजार ” चे मालक रवींद्र शंकर सुतार यांनी सांगितले कि , २५ वर्षांपूर्वी संकेश्वर पासून आमच्या या फर्निचर विक्रीच्या प्रवासाला सुरुवात झाली . त्यावेळी लोकांना आम्ही बेळगावमधून हे फर्निचर आणून विकत आहोत असे वाटायचे . त्यावेळी मनात आपणही बेळगावमध्ये फर्निचर शोरूम सुरु करावी असा विचार चमकून गेला . सर्वांच्या आशीर्वादामुळे आज आम्ही आमचे शोरूम बेळगावमध्ये सुरु केले आहे . सर्व ग्राहकांना कमी किमतीत फर्निचर उपलब्ध करून देण्याचा आमचा हेतू आहे . लाखो रुपये खर्चून बदलेल्या घरासाठी फर्निचर ही तितकीच आवश्यक आणि महत्वाची गोष्ट आहे . यासाठी आम्ही फक्त दीड लाख रुपये पॅकेजमध्ये दोन बेडरूम हॉल ,किचनचे फर्निचर उपलब्ध करून दिले आहे . ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले . यावेळी उद्योजक अनिल पाटील , डॉ . जकाती , तसेच रवींद्र शंकर सुतार यांचे कुटुंबीय आणि अन्य मान्यवर उपस्थित होते .

Tags:

#innews #innewsbelagavi #belgaumnews #belagavbgm-#stylish#furniture