Belagavi

कन्नड आंदोलकांवरील खटले मागे घेण्याची मागणी

Share

बेळगाव मनपासमोर कन्नड ध्वज फडकावल्याप्रकरणी कोरोना आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ (ब) अन्वये दाखल केलेले खटले मागे घेण्याची मागणी नम्मा विजयकुमार आणि कन्नड आंदोलकांनी केली आहे.

बेळगाव मनपासमोर कन्नड ध्वज फडकावल्याप्रकरणी दाखल खटल्यात आज सुनावणीला उपस्थित राहिल्यानंतर ज्येष्ठ कार्यकर्ते नम्मा विजयकुमार तसेच कन्नड समर्थक कार्यकर्ते श्रीनिवास ताळूकर व इतरांनी प्रसारमाध्यमांसमोर निवेदन दिले. बेळगाव महानगरपालिकेच्या आवारात कन्नड ध्वज फाटून अस्वच्छ झाला होता. महापालिकेने तोबदलायला हवा होता. पण ते आपले कर्तव्य विसरले आणि कन्नड ध्वजाचा अवमान होत असल्याने कन्नड आंदोलकांनी दुसरा नवा ध्वज लावला.

कर्नाटक नामकरणाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने भाषा, सीमा, रोजगार, शिक्षणाच्या मुद्द्यावरून कन्नड कार्यकर्त्यांवर दाखल झालेले खटलेही रद्द करावेत. कन्नड रक्षणकर्ते म्हणून सीएम सिद्धरामय्या यांचे कार्य यशस्वी झाले आहे. तरीही सरकारने राज्यात कन्नड नेमप्लेट्स बसविण्याचे आदेश दिले असून ज्यांनी कन्नड नेमप्लेट्स लावल्या नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

‘हेसराईतु कर्नाटक, उसिरागली कन्नड’ हा उत्तम कार्यक्रम करणाऱ्या राज्य सरकारने कन्नड समर्थक लढवय्यांवरील खटला मागे घ्यावा आणि कन्नडवासीयांना मोकळा श्वास घेऊ द्यावा, असे मत श्रीनिवास ताळूकर यांनी व्यक्त केले. 2020 मध्ये बेळगाव महानगरपालिकेसमोर कन्नड ध्वज फडकवल्याबद्दल 11 जणांवर कोरोना आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51 (ब) अन्वये 5/6/2021 रोजी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आम्ही न्यायालयात चकरा मारत आहोत. वर्षानुवर्षे खोटे गुन्हे दाखल करून आमचा मानसिक छळ करण्याचे काम सरकार करत आहे, आमच्यावरील खटले तात्काळ फेटाळण्यात यावे, मेकेदाटूच्या संघर्षात सहभागी झालेल्या आंदोलकांचे खटले मागे घेणाऱ्या सरकारने कन्नड समर्थक लढवय्यांविरुद्ध खटले मागे घ्यावे. काल 1 नोव्हेंबरला आम्ही राजोत्सव मोठ्या थाटात साजरा केला, आणि आज आम्हाला न्यायालयात हजर व्हावे लागले आहे. यावेळी वाजिद हिरेकोडी, सिद्धप्पा सुगंधी, अकबर सडेकर, रेश्मा कित्तूर, नागेश कोप्पद आदींसह कन्नड आंदोलक यावेळी उपस्थित होते.

Tags:

#innews #innewsbelagavi #belgaumnews #belagav #kannad#sanghtne