Belagavi

भरधाव दुचाकीला अपघात; चालक-पादचारी जागीच ठार

Share

बेळगावातील कन्नड राज्योत्सवात भाग घेऊन परतत असताना कित्तूर तालुक्यातील एमके हुबळीजवळ राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी रात्री पादचाऱ्यांना दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. मृतांत दुचाकीचालक व पादचाऱ्याचा समावेश आहे.

पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. धारवाड जिल्ह्यातील नरेंद्र गावातील लबैक हलसिगर आणि बेळगाव तालुक्यातील बाळेकुंद्री गावातील श्रीनाथ गुजनाळ अशी मृतांची नावे आहेत. या घटनेत धारवाड शहरातील अल्ताफ नालबंद आणि कडतन बागेवाडी येथील अर्जुन रंगन्नावर हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

दुचाकी इतक्या भरधाव वेगाने जात होती की, तरुणाचा मृतदेह ज्या ठिकाणी पडला त्या ठिकाणापासून 300 मीटर अंतरावर दुचाकी आढळून आली. दुचाकीवरून दोन तरुण भरधाव वेगाने जात होते. त्याचवेळी महामार्गालगतच्या एका हॉटेलमध्ये जेवण आटोपून दोन तरुण महामार्ग ओलांडत होते. त्यावेळी वेगाने आलेल्या दुचाकीने पादचाऱ्यांना धडक दिली. स्थानिक पोलिसांनी सांगितले की, दुचाकीस्वार आणि पादचाऱ्याचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. याप्रकरणी कित्तूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

#innews #innewsbelagavi #belgaumnews #belagav bgm-#kittur#accident#death