Belagavi

सालहळ्ळी मोरारजी निवासी शाळेतील विध्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

Share

रामदुर्ग तालुक्यातील सालहळ्ळी गावातील मोरारजी देसाई शासकीय अल्पसंख्याक निवासी विद्यालयात अन्नातून विषबाधा झाल्याने 50 हून अधिक विध्यार्थी अत्यवस्थ झाले, तर 5 जणांची स्थिती गंभीर असल्याची घटना घडली आहे.

रामदुर्ग तालुक्यातील सालहळ्ळी गावात अल्पसंख्यांक विध्यार्थ्यांसाठी मोरारजी देसाई शासकीय अल्पसंख्याक निवासी विद्यालय आहे. या शाळेत दिलेले जेवण घेतल्यावर 50 हून अधिक विध्यार्थी अत्यवस्थ झाले. त्यापैकी पाच विध्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. सकाळी तांदळाचा पुलावा खाताना त्यामध्ये अळ्या आढळून आल्या. पुलावाचे सेवन करणाऱ्या पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. त्यांच्यावर रामदुर्ग सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

Tags:

#innews #innewsbelagavi #belgaumnews #belagav bgm-ramdurga#food#poison