बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन आयोजित 17 वी जिल्हा रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप आणि निवड चाचण्या 2023
दिनांक 29 ऑक्टोबर 2023 रोजी बेळगावातील ओम नगरमधील शिवगंगा स्पोर्ट्स अकादमी स्केटिंग रिंक येथे पार पडली. या आणि निवड चाचणी व चॅम्पियनशिपमध्ये 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी भाग घेतला.
या चॅम्पियनशिपचा उद्घाटन सोहळा व बक्षीस वितरण समारंभास सौ.ज्योती चिंडक, आंतरराष्ट्रीय स्केटर निखिल चिंडक, स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, विश्वनाथ येळ्ळूरकर, तुकाराम पाटील, सुरज शिंदे, अजित शिलेदार, विनायक पाटील, स्केटर्स व पालक उपस्थित होते.
निवड चाचणी व चॅम्पियनशिप आयोजित करण्यासाठी स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, विठ्ठल गगणे, अनुष्का शंकरगौडा, सक्षम जाधव, अजित शिलेदार, तुकाराम पाटील, माडीवाले, सोहम हिंडलगेकर आदींनी मोठी मेहनत घेतली.


Recent Comments