एकाच छताखाली संपूर्ण भारतातील उत्पादने आपल्याला न्यू इंडियन क्राफ्टने 100 हून स्टाॅलच्या माध्यमातून येथे उपलब्ध करून दिली आहेत. याचा बेळगावकरांनी लाभ घ्यावा तसेच हस्तकला कारागिरांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सी सी होंदडकट्टी यांनी आज केले.

चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सी सी होंदडकट्टी यांनी प्रारंभी फीत कापून व दीपप्रज्वलनाने न्यू इंडियन क्राफ्ट एक्स्पो प्रदर्शनाचे उद्घाटन केले. यावेळी दिया कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या संचालिका सौ सोनिया जांग्रा व चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष विकास कलघटगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रारंभी यश कम्युनिकेशनचे संचालक, आयोजक प्रकाश कालकुंद्रीकर यांनी प्रदर्शनाची माहिती दिली व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान केला.
न्यू इंडियन क्राफ्ट एक्स्पोमध्ये भारतातील सर्व राज्यातून मांडलेल्या आकर्षक व नाविन्यपूर्ण वस्तूंची बेळगाव येथील महिलांनी प्रत्यक्ष पाहणी करून पाहणी करून खरेदी करावी असे आवाहन सौ सोनिया जांग्रा यांनी केले.
न्यू इंडीयन क्राफ्टस एक्स्पो आता कुंदानगरी बेळगावमधील सदाशिवनगर परिसरांत लक्ष्मी कॉम्प्लेक्स शेजारी सुरु झाले आहे.
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडीसा, काश्मीर, सिमला, पंजाब, आसाम, अरुणाचल, पश्चिम बंगाल, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, केरळ, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटक येथील हस्तकला कारागीरांनी स्वत: हातानी बनविलेल्या वस्तू या हस्तकला प्रदर्शनात अत्यंत माफक दरात उपलब्ध होत आहेत.
हँडमेड गिफ्ट्स, हॅंडमेड प्रोडक्टस, ज्वेलरी, होमडेकोर, टेराकोटा व खुर्जा क्राॅकरी, डिजाईनर क्लोथ, कोलकाता, आसामी क्लोथ, पंजाबी व राजस्थानी चप्पल, कारपेट, पायपोस, हर्बल प्रोडक्ट्स, होम फर्निशिंग बुक्स, शूज रॅक, काश्मीरी शाल व सूट, खादी कपड़ा, खादी हॅंण्डलुम, गुजराती व कलकत्ता पर्स, किचन वेयर, सहारनपुर फर्निचर, राजस्थानी लोणचे, लाखेच्या बांगड्या, टी शर्ट, मुलांची खेळणी, जयपुरी रजई, लेदर आयटम, बेडशीट, वुडन कार्विंग, मेटल क्राफ्ट, लेडीज कुर्ती, गाऊन, क्राॅकरी, बरण्या, आयुर्वेदिक उत्पादने, राजस्थानी चुरण, साॅफ्ट खेळणी, चन्नपटणमची खेळणी, सौंदर्य प्रसाधने, गृह सजावटीसाठीचे विविध साहित्य, हैद्राबादी बॅंगल्स, मोती, खवय्यांसाठी मसाले, लोणचे, पापड, चटण्या, विंडोज डोअर कर्टन्स, लेडीज गाऊन, मोबाईल कव्हर, शिवाय मैसूर हेअर ऑइल, तिरुपुर टी-शर्ट पायजमा ट्रॅक सूट खेकडा बेडशीट्स च्या शेकडो व्हरायटीज अत्यंत वाजवी दरात उपलब्ध आहेत.
हे प्रदर्शन 35 दिवस चालणार असून प्रदर्शनात प्रवेश व पार्किंगची मोफत सोय आहे. यावेळी आयोजक आशुतोष शर्मा तसेच आकाश कुमार, बाबू अवस्थी, धरमिंद कुमार, सिंतू कुमार, अनिल शर्मा, सराफत अली, इम्रान अली, फुरकान अली, दिपू कुमार, सुहेब, हसन, सन्नी सिंग उपस्थित होते.


Recent Comments