महाराष्ट्र आणि गोवा येथे हॉटेल व्यवसायात अल्पावधीत नावारूपास आलेल्या गावडे बंधूंनी आता बेळगावातून कर्नाटकात हॉटेल व्यवसायात पदार्पण केले आहे. मच्छेजवळ सुरु केलेल्या हॉटेल प्रणामच्या शुभारंभानिमित्त ग्राहकांसाठी आयोजित लकी ड्रॉची सोडत विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर काढण्यात आली. यात सेजल कुंभार या युवतीने पहिल्या क्रमांकाचे होंडा ऍक्टिव्हा बक्षीस जिंकले.
होय, ग्राहकांना उत्तमोत्तम दर्जाचे, स्वच्छ-शुद्ध भोजन देण्यासाठी प्रसिद्ध असलेले हॉटेल व्यावसायिक गावडे बंधू महाराष्ट्र-गोव्यानंतर आता बेळगावकर खवय्यांच्या सेवेत दाखल झाले आहेत. चंदगड-महाराष्ट्र आणि गोवा येथे त्यांची हॉटेल याआधीच ग्राहकांना चांगली सेवा देत आहेत. आता दर्जेदार शुद्ध शाकाहारी जेवण, नाश्ता देण्याच्या हेतूने त्यांनी बेळगाव-गोवा रोडवरील मच्छे गावाजवळ महावीर सर्कल येथे “हॉटेल प्रणाम” या नावाने प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट सुरु केले आहे. या हॉटेलच्या माध्यमातून त्यांनी बेळगावकर खवय्यांना दर्जेदार, शुद्ध शाकाहारी, रुचकर भोजन आणि नाश्ता देण्याचा संकल्प केला आहे. या हॉटेलच्या शुभारंभानिमित्त 18 जुलै ते 24 ऑक्टोबर 2023 या काळात हॉटेलमध्ये 300 रुपयांचे जेवण ऑर्डर केलेल्या ग्राहकांसाठी 11 बक्षिसांची खास लकी ड्रॉ कुपन सोडत योजना राबवली होती.
त्याची सोडत मंगळवारी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर काढण्यात आली. यात सेजल कुंभार या युवतीने पहिल्या क्रमांकाचे होंडा ऍक्टिव्हा बक्षीस जिंकले
याप्रसंगी हॉटेल मालक लक्ष्मण गावडे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून सर्वाना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, चांगल्या, उत्कृष्ट दर्जाचे जेवण, आपुलकीची तत्काळ सेवा आणि सर्वानाच परवडतील असे माफक दर ही आमच्या सर्व हॉटेल्सची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे ग्राहकांचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मच्छे येथील हॉटेलच्या शुभारंभानिमित्त आम्ही लकी ड्रॉ स्कीम ठेवली होती. त्याचा ड्रॉ आज विजयादशमी निमित्त काढला आहे. सर्व विजेत्यांचे अभिनंदन, ग्राहक आणि आमच्यात एक ऋणानुबंध निर्माण व्हावा यासाठी आम्ही अशा सोडती आयोजित करून त्याचा लाभ ग्राहकांना देतो. असाच प्रतिसाद आम्हाला कायम द्यावा असे आवाहन त्यांनी केले.
संचालक विष्णू गावडे यांनी सांगितले की, गोवा, महाराष्ट्रानंतर आम्ही आता कर्नाटकात बेळगावकर खवय्यांच्या सेवेत दाखल झालो आहोत. याआधी आमच्या हॉटेल्सना ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. मच्छे येथेही नव्या हॉटेलला चांगला प्रतिसाद लाभत आहे. डॉ. पद्मराज पाटील, विकास पाटील यांच्या मदतीमुळे आम्हाला बेळगावात चांगली, मोक्याची जागा मिळाली आहे. ग्राहकांना नेहमी त्यांच्या पसंतीचे अत्युत्तम खाद्यपदार्थ, भोजन, नाश्ता देण्याचा प्रयत्न आम्ही करू असे सांगून सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.
प्रमुख पाहुणे डॉ. पद्मराज पाटील म्हणाले की, मच्छे परिसरात खाद्यप्रेमींना, नागरिकांना उत्तम दर्जाचे जेवण मिळणे कठीण होते. ती कमतरता आता हॉटेल प्रणाममुळे भरून निघाली आहे. मच्छे हे गोव्याला जाण्यापूर्वी लागणारे पहिले ठिकाण आहे. त्यामुळे येथे चांगले, दर्जेदार जेवण व नाश्ता ग्राहकांना उपलब्ध करून देण्याची सूचना आम्ही गावडे बंधूंना केली आहे. शहरातील अनेक नामवंत हॉटेलपेक्षाही चांगली सेवा माफक दरात ते देत आहेत. ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
दरम्यान, सेजल कुंभार या युवतीने लकी ड्रॉचे पहिल्या क्रमांकाचे बक्षीस होंडा ऍक्टिवा जिंकली. मला शिक्षणासाठी दुचाकीची गरज होती. पहिल्या क्रमांकाचे होंडा ऍक्टिवा बक्षीस जिंकल्याने मला आनंद झाला आहे. आता मी वेळेवर कॉलेजला जाऊ शकेन आणि मनपूर्वक अभ्यास करून शिकून यश मिळवू शकेन असा आशावाद तिने प्रकट केला.
याप्रसंगी लहान मुलांच्या हस्ते लकी ड्रॉ सोडत काढण्यात आली. त्यात सेजल कुंभार हिने पहिल्या क्रमांकाचे बक्षीस होंडा ऍक्टिव्हा मिळवले. दुसऱ्या क्रमांकाचे वॉशिंग मशिन्स बक्षीस विशाल लाड यांनी मिळवले. तिसऱ्या क्रमांकाचे स्मार्ट एलईडी टीव्ही बक्षीस गीतेश, पुणे यांनी मिळवले. चौथे स्मार्ट मोबाईल बक्षीस वरद पाटील, पाचवे वॉटर कुलर राजू जैन, सहावे बजाज ओव्हन एम. पी. हुद्दार यांनी, सातवे वॉटर फिल्टर अनिकेत आर. एच. यांनी, आठवे होम थिएटर पिरनवाडी युवक, नववे बजाज मिक्सर परेप्पा इर्शन्नावर यांनी, दहावे प्रेस्टिज कुकर प्रतीक्षा पाटील यांनी तर अकरावे बक्षीस हेअर ड्रायर वेदांत उप्पीन यांनी मिळवले
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पद्मराज पाटील, विकास पाटील, संतोष जैनोजी, एकनाथ पेडणेकर, सुनील जाधव, डॉ. विद्या पाटील, डॉ. मुरुगेश कुरणी, सीमा, बसवराज, मिलिंद पाटील आदी उपस्थित होते. प्रणाम हॉटेलचे मालक लक्ष्मण गावडे यांनी स्वागत केले.


Recent Comments