शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे बेळगाव तालुक्यातील कडोली येथे रविवारी आयोजित दुर्गामाता दौडला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
अष्टमीनिमित्त काढलेल्या श्री दुर्गामाता दौडला ग्रा पं.अध्यक्ष सागर पाटील, ग्रा.पं. उपाध्यक्षा दिपा मरगाळेसह, सर्व ग्रा.पं.सदस्य,पिडिओ कृष्णाबाई भंडारीसह पदाधिकाऱ्यांतर्फे सामुहिकरित्या श्रीमठ गदगी, ध्वज, शस्त्र, शिवप्रतिमा पुजन करुन चालना दिली. प्रेरणा मंत्राचे पठण करण्यात आले. दौडीमध्ये पांढरा शुभ्र पोषाख, टोपी, भगवे फेटे व उपरणी, तलवार परिधान करुन बालचमु, युवक, युवती, जेष्ठ वयोवृद्धांनी भाग घेतला. मार्गावर सुबक रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या. महिलांनी ठिकठिकाणी पाणी घालुन आरती ओवाळून श्रद्धाभक्तीने दौडीचे स्वागत केले.
बसवाण्णा मंदिर येथे बसवाण्णानगरतर्फे दौडीचे स्वागत माजी पिकेपिएस अध्यक्ष शिवाजी बाळेकुंद्री यांनी, अयोध्यानगरतर्फे स्वागत युवा कार्यकर्ते विनोद झाडमाळे यांनी तर कचेरी गल्लीतर्फे निवृत्त सुभेदार सुनिल पाटील, श्रीधर नाडगौडा, प्रकाश कटांबळे व भारतीय सैनिक धर्मेंद्र पवार आदींच्या हस्ते ध्वज, शिवप्रतिमा व शस्त्र पुजा करण्यात आले. कचेरी गल्लीतर्फे जल्लोशी स्वागत करण्यात आल्यानंतर शिवरायांची आरती व ध्येय मंत्राने आजच्या दौडची सांगता झाली.

यावेळी माजी जि.पं. सदस्य उदय सिद्धण्णवर, प्रसिद्ध अडत व्यापारी संभाजी होनगेकर, संभाजी पवार, शिवाजी कुट्रे, कल्लाप्पा बिजगत्तीचे, राजु उच्चुकर, सोमनाथ पाटील, शुभम बोकडे, सागर फडके, सागर उच्चुकर, उमेश कुट्रे, प्रमोद पाटील, रितेश पाटील, वैभव घुगरे, तुशार कटांबले, अजय डोंबले यांची प्रमुख उपस्थिती होती.


Recent Comments