भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा प्रारंभबिंदू असलेल्या राणी चन्नम्मा यांच्या कित्तूरमध्ये दाखल झालेल्या विजयज्योतीचे नंदी ध्वज फडकावून भव्य पद्धतीने स्वागत करून कित्तूर उत्सव-2023 ला सुरुवात करण्यात आली.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री तथा बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी राज्यभर फिरून आज सकाळी चन्नम्माच्या कित्तूर येथे आलेल्या विजयज्योतीचे शानदार स्वागत केले.
पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालविकास विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार बाबासाहेब पाटील, बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी, बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ, जिल्हाधिकारी नितेश पाटील, कित्तूरच्या मडीवाळ राजगुरु संस्थान कलमठचे मडीवाळ राजयोगींद्र स्वामी यांच्यासह सर्व मान्यवरांनी या कार्यक्रमाला चालना दिली. त्यांनी कित्तूरच्या चनम्मा सर्कलमध्ये चनम्म्माच्या पुतळ्याला आणि प्रवेशद्वारात एकमेकांशेजारी असलेल्या आमटूरु बाळाप्पा आणि संगोळ्ळी रायण्णा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.
महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी कन्नड राज्याचे कलात्मक वैभव दर्शविणाऱ्या विविध कला पथकांच्या संचलनाला चालना दिली.
पूर्णकुंभ, डोल्लुकुनिता, गोम्बेकुनीता, कुद्रेकुनिता, लमाणी नृत्य, झांज पथक, चंदिमेला, नागरी, कथकली पथके, महिला आणि लोकसंगीतकारांनी कित्तूर चेन्नम्मा, संगोळ्ळी रायण्णा, ओनके ओबव्वा यांच्या वेशभूषेतील मुलांनी संगीताच्या कार्यक्रमात रंग भरला. चन्नम्मा चौकापासून निघालेल्या या मिरवणुकीची मुख्य मार्गावरून फिरून निच्चनकी मठाच्या आवारात सांगता झाली.
आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते किल्ल्याच्या भिंतीआड प्रथमच उभारण्यात आलेल्या प्रदर्शन मेळ्याचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी खासदार मंगला अंगडी, चन्नम्मा कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील, जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद, बैलहोंगलच्या प्रांताधिकारी प्रभावती, जिल्हा औद्योगिक केंद्राचे सहसंचालक सत्यनारायण, जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. महेश कोणी, उद्यान विभागाचे उपसंचालक महांतेश मुरगोड आदी उपस्थित होते.
या मिरवणुकीत कित्तूर, बैलहोंगलसह आसपासच्या गावातील हजारो लोक सहभागी झाले होते.


Recent Comments