झी कन्नड वाहिनीवरील सारेगमप फेम. दिया हेगडे हिचा बेळगाव येथील हनुमान नगर येथील ग्लास हाऊस येथील खचाखच भरलेल्या सभागृहात सन्मान सोहळा पार पडला.
बेळगावचे नागरिक, हनुमान प्रसाद समितीचे पदाधिकारी राहुल मेत्री, डी.सी. देशपांडे, अलगुंडगी आणि श्री ललिता आराधना मंडळाच्या भगिनी प्रतिमा आंबेकर, भावना कुलकर्णी, सुनीता माने, सावित्री पाटील, दीपा देशपांडे, संध्या भट यांनी तिचा सत्कार केला .
शिवपुत्र फटकळ, प्रल्हाद दादा आंबेकर, चिदंबर कुलकर्णी, जयेंद्र माने, गणेश हेगडे, परमेश्वर हेगडे, सीताराम भागवत उपस्थित होते.
दिया हेगडे यांची मोठी बहीण दिशा हेगडे हिचा देखील यावेळी गौरव करण्यात आला.
दिया हेगडे यांनी सन्मानाला प्रतिसाद देत बेळगावातील नागरिकांचे व कार्यक्रमाच्या आयोजकांचे अभिनंदन केले. शेवटी दिशा हेगडेने श्लोक, गाणे आणि चित्रपट गीते सादर केली .


Recent Comments