२३ ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या कित्तूर उत्सव ज्योतीचे आज बेळगाव मधील चन्नम्मा सर्कल येथे, बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून , ढोल ताशांच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आले.

चन्नम्मा कित्तूर उत्सव 2023 च्या वीरज्योतीचे आज बेळगावमध्ये आगमन झाले . बेळगाव जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेच्या वतीने या ज्योतीचे टोचलं ताशांच्या गजरात , भव्य स्वागत करण्यात आले .
यावेळी आमदार राजू शेठ, जिल्हाधिकारी नितेश पाटील, कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील, महापौर शोभा सोमनाचे , उपमहापौर रेश्मा पाटील यांनी चन्नम्माच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, कित्तूर उत्सव ज्योतीचे पूजन केले
यावेळी, यल्लाप्पा हुदली, कन्नड संस्कृती विभागाच्या संचालिका विद्यावती भजंत्री, राजशेखर डोणी आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments