Belagavi

महेश्वर महादेव मंदिराचे उद्धघाटन आणि शिवलिंग प्राण -प्रतिष्ठा सोहळा

Share

श्री वेंकटेश्वरा को -ऑपरेटिव्ह पावर अँड ऍग्रो प्रोसेसिंग लिमिटेडच्या वतीने, महेश्वर महादेव मंदिराचे उद्धघाटन आणि शिवलिंग प्राण -प्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे .

श्री वेंकटेश्वरा को -ऑपरेटिव्ह पावर अँड ऍग्रो प्रोसेसिंग लिमिटेड ही एक मल्टी स्टेट को – ऑपरेटिव्ह सोसायटी आहे . या सोसायटीचे महाराष्ट्र आणि कर्नाटकात , ४५ हजाराहून अधिक , माजी सैनिक आणि शेतकरी सभासद आहेत .

ह्या आर्थिक वर्षात , गोवा , केरळ , तामिळनाडू , आंध्रप्रदेश , तेलंगणा , ओडिसा , मध्यप्रदेश आणि गुजराथ या राज्यांमध्ये सोसायटीचा विस्तार होणार आहे . या सोसायटीची मालेगाव , नाशिक येथे ५२८ एकर जमीन असून , त्यात जैविक कृषी अंतर्गत विविध फळाचे उत्पादन घेतले जात आहेत . ८० एकरात होळीचे उत्पादन घेऊन , हळद प्रकिया प्लांट सहित , विविध उत्पादनाने घेतली जातात .

श्री वेंकटेश्वरा को -ऑपरेटिव्ह पावर अँड ऍग्रो प्रोसेसिंग लिमिटेडच्या सर्व सदस्यांच्या प्रयत्नांमुळे , कर्नाटकातील बेळगाव येथे , दररोज २० टन उत्पादन क्षमतेची पूर्ण ऑटोमॅटिक काजू प्रोसेजिंग फॅक्टरी उभारण्यात येत आहे . ज्याचे पुढील महिन्यात काम पूर्ण होईल . बेळगावच्या गणेशपूर -बेळगुंदी रोडवरील उचगाव क्रॉस येथील , सागर गोडाऊनच्या मागे असलेल्या वेंकटेश्वरा काजू फॅक्टरीच्या आवारात , बांधलेल्या महेश्वर महादेव मंदिराचे उद्घाटन आणि शिवलिंग प्राण प्रतिष्ठापना सोहळा आचार्य महामंडलेश्वर स्वामी सविदानंद सरस्वती महाराज यांच्या हस्ते होणार आहे . या निमित्ताने २० ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर या काळात विविध अधार्मिक कार्यक्रम होणार आहेत .

२० ऑक्टोबर रोजी , प्रधान संकल्प , गणेश पूजन , मातृका पूजन , प्रस्थापित देवतेचे आवाहन , नवग्रह पूजन , कुटीर होम , प्रधान मंडळ पूजन , आणि मूर्ती जलधिवास असे कार्यक्रम होणार आहेत . त्याच प्रमाणे २१ ऑक्टोबर रोजी , साडेतीन वाजता कृषी सेवा केंद्राचे उद्घाटन तसेच विविध धार्मिक कार्यक्रम होणारं आहेत .

त्याचप्रमाणे कार्यक्रमाच्या अंतिम दिवशी , होमहवनासहित , महाआरती आणि महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे . यासाठी सर्वानी उपस्थित राहावे ते आवाहन , श्री वेंकटेश्वरा को -ऑपरेटिव्ह पावर अँड ऍग्रो प्रोसेसिंग लिमिटेडचे चेअरमन तसेच व्यवस्थापकीय संचालक शिवाजी शामराव डोळे तसेच संचालक यल्लाप्पा पुनाप्पा झंगरूचे तसेच सर्व संचालक मंडळ आणि सदस्यांनी यांनी केले आहे .

Tags: