देव, देश आणि धर्माच्या रक्षणाचा ध्यास घेऊन नवरात्रानिमित्त काढण्यात येत असलेल्या दुर्गामाता दौडला बेळगावात आज पाचव्या दिवशीही प्रचंड प्रतिसाद लाभला. धर्मवीर संभाजी चौक ते संयुक्त महाराष्ट चौक परिसरात काढलेल्या या दौडीत हजारोंच्या संख्येने लहान मुले-मुली, युवक-युवती आणि महिला-पुरुषांचा लक्षणीय सहभाग होता .

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे नवरात्रात काढण्यात येणाऱ्या दुर्गामाता दौडीचा आज पाचवा दिवस. गेल्या चार दिवसांप्रमाणेच आज पाचव्या दिवशीही दौडीला बेळगावकरांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. पांढरे शुभ्र कपडे, टोप्या, भगवे फेटे घालून हाती भगवे ध्वज घेऊन धारकरी दौडीमध्ये सहभागी झाले होते. त्यांच्या सळसळत्या उत्साहाने दौड काढण्यात आलेल्या परिसरात सर्वत्र चैतन्यमयी वातावरण निर्माण झाले होते.
आजच्या नवरात्राच्या पाचव्या दिवशीच्या दौडला धर्मवीर संभाजी चौक येथून प्रारंभ झाला . किर्लोस्कर रोड, रामलिंग खिंड गल्ली , अशोक चौक , बसवाणं गल्ली , लक्ष्मी मंदिर , नरगुंदकर भावे चौक , गणपत गल्ली , कडोलकर गल्ली , बुरुड गल्ली , भातकांडे गल्ली , मेणसी गल्ली , आझाद गल्ली , टेंगिनकेरा गल्ली , भोवी गल्ली , बापट गल्ली , पांगुळ गल्ली , कामात गल्ली , पी बी रोड , मार्केट पोलीस स्टेशन , शेट्टी गल्ली , भडकलं गल्ली , कोर्ट कॉर्नर , सरदार ग्राउंड रोड , सन्मान हॉटेल , कॉलेज रोड , यंदेखूट , कीरॉलोस्कर रोड , कडोलकर गल्ली ,बापट गल्ली , संयुक्त महाराष्ट चौक येथे दुर्गामाता दौडची सांगता झाली.
दौडच्या मार्गावर महिलांनी सुबक रांगोळ्या काढल्या होत्या. तर ठिकठिकाणी फुलांची उधळण करून दौडीचे स्वागत जल्लोषात करण्यात आले. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या जीवनातील प्रसंगांवर आधारित सजीव देखावे साकारण्यात आले होते. महिलांनी भगव्या ध्वजाला आरती ओवाळून दौडीचे स्वागत केले.
दरम्यान इन न्यूजशी बोलताना या दौडीत सहभागी झालेल्या मुलींनी सांगितले कि दौडीत सहभागी झाल्याने , संभाजी भिडे गुरुजींनी सूर केलेल्या या दौडीमुळे नव्या पिढीला देव, देश अन धर्माच्या रक्षणाचे धडे दुर्गामाता दौडमधून मिळतात. मुली देखील यात सहभागी होतात , मुलींना पण प्रोत्साहन मिळते .


Recent Comments