Belagavi

बेळगावात वाल्मी केंद्राच्या स्थापनेची डीकेशींची घोषणा

Share

म्हादई योजनेच्या अंमलबजावणीसाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. त्यासाठी केंद्र सरकार आणि भाजप नेत्यांनी सहकार्य करावे असे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी आज बेळगावात पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत जिल्ह्यातील उपलब्ध पाणीसाठ्याची आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. काही पाणी वापरकर्ता संघटना कार्यरत आहेत, तर काही निष्क्रिय आहेत. येत्या शंभर दिवसांत पाणी वापरकर्ता संघ स्थापन करण्याचा आदेश पाठवणार आहे. शेतकऱ्यांना घटनास्थळी पाठवावे.

कालव्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी कार्यवाही करावी. नरेगामध्येही हे काम करण्याची सूचना केली जाणार आहे. पाटबंधारे अधिकारी व पाणी वापरकर्ता संघ पदाधिकाऱ्यांनी बैठका घेऊन एकत्रितपणे काम करावे असे ते म्हणाले. संबंधित विभागातील व्हॉल्व्हमेन्सना प्रशिक्षण देण्याची योजना आखली जात आहे. त्यासाठी बेळगावात वाल्मी केंद्राची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

तलावांमधील पाण्याची चोरी होत असल्याकडे महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले आहे. पाणीचोरी रोखण्यासाठी नवा कायदा करण्यात येणार आहे. म्हादई योजनेच्या अंमलबजावणीसाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. यासाठी केंद्र सरकार आणि भाजप नेत्यांनी सहकार्य करावे, असे ते म्हणाले.

डीके शिवकुमार पुन्हा तिहार तुरुंगात जाणार असल्याचे नलिनकुमार कटील आणि एचडी कुमारस्वामी सांगत फिरत आहेत. ते कोण जज लागून गेले आहेत का असा सवाल उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी केला. सीटी रवी मला केडी म्हणतात, भाजपवाल्यानीच त्यांना ‘लुटी रवी’ असे नाव दिले आहे. माझ्याबद्दल आणि काँग्रेसबद्दल बोलण्याची त्यांची नैतिकता नाही, असे ते म्हणाले. बाइट

Tags: