Belagavi

समाजाच्या जडणघडणीत श्वेतांबर जैन समाजाचे योगदान मोठे : खा. मंगल अंगडी

Share

समाजाच्या जडणघडणीत श्वेतांबर जैन समाजाचे योगदान मोठे आहे असे प्रशंसोद्गार खासदार मंगल अंगडी यांनी काढले.

बेळगावातील पांगुळ गल्लीत श्री चंद्रप्रभ जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघातर्फे सर्वधर्मियांत एकता आणि मैत्रीची भावना वाढीस लागावी यासाठी आज ‘मैत्री’ महाप्रसादाचे आयोजन केले होते. त्याचे उदघाटन केल्यानंतर बोलताना खा. मंगल अंगडी पुढे म्हणाल्या की, श्री चंद्रप्रभ जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघातर्फे बेळगावात अनेक सामाजिक उपक्रम वरचेवर राबवले जातात.

समाजाच्या जडणघडणीत श्वेतांबर जैन समाजाचे योगदान मोठे आहे. अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानले जाते. महाप्रसादाच्या माध्यमातून हे महान कार्य या समाजाने आज केले आहे. त्यांच्या सर्व उपक्रमांना मी शुभेच्छा देते असे त्यांनी सांगितले. बाईट.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना साध्वी विरेशबाला यांनी सांगितले की, प्रत्येक जिवाबद्दल मैत्री, प्रेम, आत्मीयतेची भावना नसेल तर मानवाला मुक्ती मिळू शकत नाही. त्यामुळे सर्वै एकमेकांशी प्रेम, मैत्रीपूर्ण भावनेने वागण्याचे आवाहन त्यांनी केले.

प्रारंभी घेवरचंद पोरवाल आणि सुमुखबेन पोरवाल यांच्याहस्ते खा. मंगल अंगडी यांचा शाल व हार घालून सत्कार करण्यात आला. त्यानंतर खा. अंगडी यांनी दीप प्रज्वलनाने उपक्रमाचे उदघाटन केले


याप्रसंगी शा उत्तम पोरवाल, शा विजय पोरवाल, शा पोपटलाल पोरवाल, राजकुमार खोडा, राजेंद्र डुमावत, भरत पोरवाल, महेश पोरवाल, डायमंड जोशी आदी उपस्थित होते. या ‘मैत्री’ महाप्रसादाचा सुमारे पाच हजार लोकांनी लाभ घेतला.

Tags: