Belagavi

राज्य सरकारच्या विरोधात बेळगावात भाजपचे आंदोलन

Share

राज्यात काँग्रेसचे सरकार येऊन पाच महिने झाले आहेत. या काळात कर्नाटकात काँग्रेस सरकार केवळ भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप करत बेळगाव जिल्हा भाजप कार्यकर्त्यांनी शहरातील चन्नम्मा चौकात आज जोरदार निदर्शने केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

काँग्रेस सरकारच्या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ बेळगावात आज भाजप कार्यकर्त्यांनी चन्नम्मा चौकात आंदोलन केले. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, देशात होणाऱ्या विविध निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाच्या हायकमांडने पैसे देण्याचा आदेश राज्य काँग्रेसला दिल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

निदर्शकांना संबोधित करताना महानगर भाजप अध्यक्ष व माजी आमदार अनिल बेनके यांनी, आज पुराव्यासह काँग्रेसवाले पकडले जात आहेत. खोटी हमी आणि खोटे आरोप करून सत्तेत आलेली काँग्रेस कंत्राटे आणि बदल्यांमध्ये भ्रष्टाचार करत आहे, असा आरोप केला

.
राज्य काँग्रेस सरकारने आपल्या हमी योजना लागू करण्यासाठी कर्नाटकचे आधीच दिवाळे काढले आहे. काँग्रेसने भाजप सरकारवर 40% कमिशनचे खोटे आरोप केले. आता कोट्यवधी रुपये काँग्रेस नेत्यांच्या घरात सापडत आहेत. काँग्रेस सरकार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यातील काँग्रेस सरकार पूर्णपणे भ्रष्टाचारात गुंतले आहे. यामध्ये सीएम सिद्धरामय्या आणि डीसीएम डीके शिवकुमार यांचा थेट सहभाग आहे. राज्याच्या विकासकामांसाठी निधी दिला जात नाही. निधी मिळत नसल्याने सर्व आमदार झगडत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

इन्कम टॅक्सच्या छाप्यात काँग्रेस नगरसेवकाच्या घरी पैसे मिळाले. हा सगळा पैसा काँग्रेसचा आहे, ते पाच राज्यात निवडणुकीसाठी पैसे गोळा करून राहुल गांधींना पाठवत आहेत असा आरोप बेनके यांनी केला.


विधान परिषद सदस्य नवीन म्हणाले की, खोटी हमी आणि खोटे आरोप करून सत्तेत आलेली काँग्रेस कंत्राटे आणि बदल्यांमध्ये भ्रष्टाचार करत आहे. काँग्रेसवाले आज पुराव्यासह पकडले जात आहेत.

खासदार मंगल अंगडी म्हणाल्या की, हमी योजनांचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या काँग्रेस पक्षाचा खरा रंग आता उघड झाला आहे. आयटीच्या छाप्यातील कोट्यवधींचा खुलासा यातून समोर आला आहे.

भाजप महानगर भाजपचे सरचिटणीस मुरुगेंद्र गौडा पाटील, दादागौडा बिरादार, नगरसेविका वीणा विजापुरे, वाणी जोशी, गिरीश धोंगडी, भाजप नेत्या विजया हिरेमठ, एफ, एस, सिद्धनगौडा, लीना टोपन्नावर, जयश्री हिरेमठ यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: