Belagavi

“बेळगावची मानाची कुलस्वामिनी ” चे जल्लोषात आगमन

Share

नवरात्री निमित्त बेळगाव च्या फुलबाग गल्लीतील , “बेळगावची मानाची कुलस्वामिनी ” चे दिमाखात आगमन झाले .

बेळगावच्या फुलबाग गल्लीतील स्वराज्यसेना युवक मंडळ तसेच राजमाता महिला मंडळाच्या वतीने गेली १६ वर्षे नवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो . ह्या मानाच्या कुलस्वामिनीच्या आगमनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला . शनिमंदिरापासून , फुलबाग गल्लीपर्यंत देवीच्या मूर्तीची मिरवणूक थाटामाटात काढण्यात आली .

यावेळी स्वराज्यसेना युवक मंडळाचे अध्यक्ष अरुण बाबू पाटील , महादेव पाटील , रुपेश घोरपडे , सुशांत पाटील , रघु पाटील , नवजित मळीक , संकल्प मळीक तसेच राजमाता महिला मंडळाच्या चंद्र चोपडे ,उषा कल्याणपूरकर , नेहा पाटील सविता कट्टी , निकिता पाटील , ज्योती कल्याणपूरकर , शुभांगी चौघुले , तसेच गल्लीतील सर्व नागरिक

या मिरवणुकीत सहभागी झाले होते .


नवरात्रीच्या या नऊ दिवसात , दांडियासहित विविध मनोरंजनाचे कार्यक्रम होणार असून , उत्सवादरम्यान महाप्रसादाचेही आयोजन केले जाणार आहे .

Tags: