बेळगाव तालुक्यातील बसवन कुडची गावात यंदाच्या नवरात्रौत्सवानिमित्त दुर्गामाता दौडचे शानदार उदघाटन करण्यात आले.
कुडची गावातील ग्रामदैवत कलमेश्वर बसवन्ना मंदिरापासून सुरू झालेली दुर्गामाता दौड निलजी गावातील लक्ष्मी मंदिरात पोहोचली. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित बसवन कुडचीत दुर्गामाता दौडचे हे 19 वे वर्ष आहे. दुर्गामाता दौडने संपूर्ण महाराष्ट्रात आणि
अनेक गावांमध्ये भव्य स्वरूप धारण केले आहे. शेकडो तरुण-तरुणींनी डोक्यावर भगवे फेटे आणि पांढरे कुर्ते परिधान करून, झेंडे व तलवारी हातात घेऊन दौडमध्ये सहभाग घेतला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तींची मिरवणूक काढली जाते. दौडच्या मार्गावर सुबक रांगोळ्या काढल्या होत्या. अनेक ठिकाणी दुर्गामाता दौडचे नागरिकांनी फुलांच्या उधळणीत स्वागत केले

दरम्यान, दौड प्रमुख नागेश बसवंत सुळेभावी यांनी बसवन कुडची येथे गेली 19 वर्षे अखंड दौड काढण्यात येत असून दरवर्षी दौडला वाढत प्रतिसाद मिळत असल्याचे सांगून अधिक माहिती दिली.
या दौडमुळे बसवन कुडची गावात चैतन्याचे वातावरण पसरले आहे


Recent Comments