मूळचे गडहिंग्लज येथील अमर दड्डी कुटुंबाने कुंदानगरी बेळगावात शुभसंगम ज्वेलर्स हे दुकान सुरु करून लोकांना उच्च दर्जाचे दागिने उपलब्ध करून देणार आहे. त्यांना या व्यवसायात यश लाभो असे निडसोशी जगद्गुरू श्री पंचम शिवलिंगेश्वर महास्वामी यांनी सांगितले.
बेळगावातील गोवावेस महात्मा फुले रोडवरील लक्ष्मी नारायण इमारतीत दड्डी परिवाराने सुरु केलेल्या शुभसंगम ज्वेलर्स स्टोअरचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
निडसोशी जगद्गुरू श्री पंचम शिवलिंगेश्वर महास्वामी पुढे म्हणाले की, माणूस आपल्या जीवनात अनेक कार्ये, व्यवसाय करतो, त्याचप्रमाणे दड्डी बंधूंनी आपल्याला संपूर्ण सराफी व्यवसायामध्ये गुंतवून घेतले आहे.
दड्डी कुटुंब समाजसेवेत सक्रिय आहे. त्यांच्या आजोबांच्या काळापासून ते सोन्याचा व्यवसाय करत आहेत. बाइट
गदग तोंतदर्य मठाचे जगद्गुरू तोंटद सिद्धराम स्वामीजी यांनी बेळगाव हे आज देशातील सर्वात सुंदर शहर आहे. अशा बेळगावमध्ये सोन्याच्या दागिन्यांचे नवे भांडार सुरू होतेय ही समाधानाची बाब आहे असे सांगितले.

ते म्हणाले की, दड्डी परिवार आज हे काम करत आहे याचा आनंद वाटतो. सोन्याचे दागिने आणि दागिन्यांची दुकाने सुंदर असली पाहिजेत कारण त्यांना ग्राहकांना आकर्षित होतील अशा पद्धतीने दागिने द्यावे लागतात.
खासदार मंगल अंगडी म्हणाल्या की, दड्डी परिवाराने आज सुरु केलेले सराफी दुकान अतिशय नीटनेटके असून ग्राहक आकर्षित होईल अशा पद्धतीने बांधले आहे. त्यांच्या दुकानाचा अधिक विकास व्हावा व त्यांनी अधिकाधिक शाखा निर्माण करून समाजाची सेवा करावी.

ज्वेलरी दुकानाचे मालक अमर दड्डी यांनी स्वामीजींचा सत्कार करून बोलताना सांगितले की, आमचे कुटुंब हे काम आमच्या आजोबांच्या काळापासून करत आहे.आज श्रींच्या आशीर्वादाने उघडलेले स्टोअर समाजासाठी उपयुक्त ठरेल. आमच्या ग्राहकांना उच्च दर्जाचे दागिने उपलब्ध करून देणे हा आमचा उद्देश आहे.
यावेळी अमर दड्डी यांनी स्वामीजींचा सत्कार केला. शुभसंगम ज्वेलर्सच्या उदघाटन समारंभात अनेक ग्राहक उपस्थित होते. फ्लो


Recent Comments