महिलेला चप्पलांचा हार घालून तिची धिंड काढल्याचा अमानुष प्रकरणाची आता पोलिसांनी गांभीर्याने दाखल घेतली आहे . आहे. माध्यमातून फिरणाऱ्या वृत्तानंतर घटप्रभा पोलिसांनी खडबडून जागे झाले असून, या प्रकरणी दलित नेते अर्जुन गुंडाप्पगोळ याच्यासह 20 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
बेळगाव जिल्ह्यातील घटप्रभा पोलिस स्टेशनमध्ये पीडित श्रीदेवी गोडची यांनी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला, ती हनीट्रॅप आणि ब्लॅकमेल करून पैसे उकळत असल्याचा आरोप करून , आरोपींनी तिला शिवीगाळ करून , मारहाण केली होती . तिच्या गळ्यात चप्पलांचा हार घालून , तिची गावात धिंड काढली होती आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी श्रीदेवी गोडची या महिलेने व्हिडीओ निवेदनाद्वारे केली होती .
या प्रकरणी प्रमुख अर्जुन गुंडाप्पगोळ याला अटक करून कारागृहात पाठवल्यानंतर उर्वरित महिला व पुरुष आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी एक पथक तयार केले असून घरात घुसून मारहाण व हार घालणाऱ्यांची नावे घेऊन गुन्हा दाखल केला आहे.


Recent Comments