बेळगाव महानगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे .
आयटी अधिकारी अविनाश टोणपे हे बेळगाव येथील एका ज्वेलरी दुकानाच्या मालकाला पैसे देण्यासाठी त्रास देत होते.
चिक्कोडी तालुक्यातील अंकली येथील परशुराम बंकापुर या सुवर्णकाराकडे आयटी अधिकारी अविनाश टोणपे दहा लाखांची मागणी करीत होता . त्याच्या त्रासाला कंटाळून बंकापूर पोलिसांत फिर्याद दिली.
या तक्रारीवरून कारवाई करत बेळगाव पोलिसांनी योजना आखून , आयटी अधिकाऱ्याला जाळयात पकडले
बेळगाव मार्केट विभागाचे एसीपी नारायण भरमणी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी कारवाई करत अविनाश टोणपे याला रोख रकमेसह अटक केली. एपीएमसी पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला आहे


Recent Comments