Belagavi

इंदिरा कॅन्टीनला अचानक भेटीत गैरप्रकार उघडकीस

Share

बेळगावच्या इंदिरा कँटीनमध्ये निकृष्ट जेवणाचा पुरवठा, गंजलेल्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करणे, स्वयंपाकघरात डास-झुरळांचा मुक्त संचार असे संतापजनक चित्र महानगर पालिकेच्या लेखा परिक्षण स्थायी समितीच्या अध्यक्षांनी इंदिरा कॅन्टीनवर टाकलेल्या छाप्यात उघडकीस आले.

राज्य सरकारच्या ‘इंदिरा कॅन्टीन’ या महत्त्वाकांक्षी योजनेत खराब अन्न पुरवठा, गंजलेल्या भांड्यांमध्ये स्वयंपाक, खराब झालेल्या भाज्यांचा वापर होत असल्याचे आढळून आले आहे. ग्राहक नसतानाही महापालिकेकडून महिन्याला दोन लाख रुपये पेमेंट इंदिरा कँटीनना केले जात आहे.
महानगरपालिकेच्या लेखा स्थायी समितीच्या अध्यक्ष व सदस्यांनी इंदिरा कँटीनवर टाकलेल्या छाप्यादरम्यान हा प्रकार उघडकीस आला. येथील गरिबांना दिल्या जाणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या जेवणामुळे नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. फ्लो
2016-17 मध्ये, शहरी आणि उपनगरी भागातील खासगी कंपन्यांचे कर्मचारी, रोजंदारी कामगार, गरीब आणि वाहन चालकांना दर्जेदार नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण माफक दरात मिळावे या उद्देशाने राज्य सरकारने महानगरपालिकेसह स्थानिक संस्थांच्या सहकार्याने राज्यभरात इंदिरा कॅन्टीन सुरू केली. परंतु, कंत्राटदारांच्या नफेखोरीमुळे आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ही इंदिरा कॅन्टीन लोकांसाठी जीवघेणी ठरली आहेत.

इंदिरा कँटीनवर 70% खर्च महापालिका आणि 30% खर्च कामगार विभाग करत आहे. मात्र, खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांना कमी किमतीत कँटीन चालवता येत नसल्याने ते कमी किमतीत मिळणाऱ्या साहित्यापासून खाद्यपदार्थ तयार करून लोकांना देत आहेत. याचा जनतेच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असल्याचा संताप नगरसेवक गिरीश धोंगडी, जयतीर्थ सौंदत्ती यांनी व्यक्त केला आहे.

एकंदर, इंदिरा कँटीन चालकांचा भोंगळ कारभार पालिका स्थायी समिती सदस्यांच्या अचानक भेटीत उघडकीस आला आहे. यावर अंकुश आणण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Tags: