चिक्कोडी लोकसभा मतदारसंघ कोअर कमिटीचे अध्यक्ष आमदार जी. टी. देवेगौडा यांच्या नेतृत्वाखाली बेळगावच्या केपीटीसीएल हॉलमध्ये जेडीएस पुनरुज्जीवन कार्यक्रम पार पडला.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जेडीएस पक्षाचे नेते राज्याच्या झंझावाती दौऱ्यावर आहेत. जेडीएस आणि भाजपची युती होऊन अवघा महिना झाला असून नेते जोरदार प्रचार करत आहेत.
कोअर कमिटीचे अध्यक्ष आमदार जी. टी. देवेगौडा यांनी आज बेळगाव येथील केपीटीसीएल सभागृहात बेळगाव, चिक्कोडी लोकसभा मतदार संघातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस सरकारवर सडकून टीका केली. पीक पिकवण्यासाठी वीज उपलब्ध नाही आणि उसाला योग्य भाव मिळत नाही. बाइट
येडियुरप्पा यांच्या कार्यकाळात 6000 निधी केंद्र सरकारने दिला, त्यात 4000 रुपये राज्याचे मिसळून दहा हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले. मात्र काँग्रेसचे सरकार आल्यावर शेतकर्यांना काहीही फायदा झाला नाही. हे सरकार आल्यावर त्यांनी पैसे नीट दिले नाहीत, वीज दिली नाही. यापूर्वी, माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी शेतकऱ्यांचे 24000 कोटींचे कर्ज माफ केले होते
सर्वसाधारणपणे, जेडीएस पक्षनेते राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दौरा करत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी जिल्हा आणि तालुका शाखांना ऊर्जा देत आहेत.
यावेळी जेडीएस जिल्हाध्यक्ष शंकर माडलगी, नेते नासिर बागवान, कल्लाप्पाण्णा मरेन्नावर, सौरभ चोप्रा, मारुती अष्टगी, प्रदीप मुळगी, पंचनगौडा दयमन्नागौडर, प्रकाश मुधोळ, बसवराज रुद्रगौडर, मल्लिकार्जुन कागवाड यांच्यासह जेडीएस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments