केएलई संस्थेच्या श्री. बीएम कंकणवाडी आयुर्वेद महाविद्यालयाला कर्नाटक सरकार, युवा सशक्तीकरण आणि क्रीडा विभागातर्फे 2021-22 वर्षासाठीचा सर्वोत्कृष्ट एनएसएस युनिट आणि सर्वोत्कृष्ट एनएसएस कार्यक्रम अधिकारी देऊन गौरविण्यात आले आहे.
बी.एम.कंकणवाडी आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास कुमार शेट्टी आणि एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. संजीव एस टोनी यांनी ‘सर्वोत्कृष्ट एनएसएस युनिट’ आणि एनएसएस कार्यक्रम अधिकारी पुरस्कार स्वीकारले. महाविद्यालयीन स्तरावर सामाजिक/समुदायभिमुख कार्य, सार्वजनिक आरोग्य सेवा, स्वच्छता उपक्रम यासाठी केलेल्या कार्याचा गौरव आणि कौतुक म्हणून हे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.
हे पुरस्कार राज्यपाल थावरचंद गहलोत यांच्या हस्ते राजभवन, बेंगळुरू येथे झालेल्या औपचारिक कार्यक्रमात अनुसूचित जमाती कल्याण, युवा सक्षमीकरण आणि क्रीडा मंत्री बी. नागेंद्र यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आले. मुख्यमंत्र्यांचे राजकीय सल्लागार आणि कर्नाटक ऑलिम्पिक असोसिएशन अध्यक्ष गोविंदराजू, युवा सक्षमीकरण आणि क्रीडा विभाग प्रधान सचिव एन. मंजुनाथ प्रसाद, राज्य एनएसएस अधिकारी डॉ. प्रताप लिंगैया आदी उपस्थित होते.
काहेरचे कुलपती आणि केएलई सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, कुलगुरू डॉ. नितीन गंगणे, कुलसचिव डॉ. एम. एस. गणाचारी यांनी बीएमकेच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी दिलेल्या अनोख्या योगदानाचे कौतुक केले आणि या अनोख्या कामगिरीबद्दल अभिनंदन केले.


Recent Comments