अनधिकृत म्हणून गाजावाजा होत असलेल्या बेळगाव मनपाच्या ‘त्या’ 138 पौरकार्मिकांना गेल्या सुमारे वर्षभरापासून वेतनच बाब उघड झाली आहे. वेतन आणि सेवासुरक्षा मिळावी या मागणीसाठी त्या 138 पौरकार्मिकांनी आज मनपाच्या सदाशिवनगर वाहनतळावर आंदोलन छेडून आपली व्यथा प्रसारमाध्यमांसमोर मांडली.

आम्ही रात्रंदिवस बेळगाव स्वच्छ-सुंदर ठेवण्यासाठी काम करत असूनही आम्हाला गेल्या 10 महिन्यांपासून पगारच देण्यात आलेला नाही अशी कैफियत मांडत 138 पौरकार्मिकांनी आज मनपाच्या सदाशिवनगर वाहनतळावर आंदोलन केले. यावेळी घोषणा देत महापालिका आणि स्वच्छता ठेकेदारांकडून होत असलेल्या टोलवाटोलवीचा निषेध करण्यात आला. आम्हाला मनपाच्या सेवेत कायम करावे अशी मागणीही आंदोलनकर्त्या कामगारांनी पौरकार्मिकांनी केली. आमच्या मागण्या मान्य न केल्यास घरातील सर्व सदस्यांना घेऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना पौरकार्मिक एकनाथ अर्जुन कोलकार यांनी सांगितले की, मला नोकरीत रुजू होऊन एक वर्ष झाले आहे. मात्र आम्हाला 10 महिन्यांपासून पगारच देण्यात आलेला नाही. आम्हाला बीव्हीजी कंपनीत सामावून घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र या कंपनीचा ठेकाच रद्द करण्यात आला. आमच्याकडून काम करवून घेतले जाते, मात्र वेतन दिले जात नाही. याबाबत मनपाला विचारल्यावर स्वच्छता ठेकेदार तुम्हाला पगार देईल असे सांगितले जाते. याउलट ठेकेदार तुमचा माझा काही संबंध नाही म्हणून उडवून लावतो. त्यामुळे आम्ही न्याय तरी कोणाकडे मागायचा? पगार नसल्याने घरखर्च चालवायचे कठीण झाले आहे. मुलांचे शिक्षण, दवाखाना, घरखर्च कसा भागवायचा? आतापर्यंत आम्ही कोणाकडून हातउसने, कर्ज घेऊन संसार चालविला. मात्र आता हे सगळे कठीण झाले आहे. त्यामुळे आम्हाला न्याय द्यावा अशी कैफियत त्यांनी मांडली. बाईट.
कचरागाडी वाहनचालक पौरकार्मिक व्यंकटेश अनंतपूरकर यांनी सांगितले की, काही पौरकार्मिकांना 3 तर काहींना तब्बल 10 महिन्यांपासून, वर्षांपासून पगार मिळालेला नाही. त्यामुळे आमच्यापुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. 10 महिन्यांपासून रात्रंदिवस काम करत असूनही मला पगार मिळालेला नाही.
आणखी एक महिला कर्मचारी म्हणाली की, गेल्या नऊ-दहा महिन्यांपासून आम्हाला आमचे पगार दिले गेले नाहीत. आमचा पगार कोणीतरी खात आहे अशी शंका आहे. ते कोण हे आम्हाला माहित नाही.
दरम्यान, महापालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी या ठिकाणी येऊन पौरकार्मिकांची समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.


Recent Comments