ही मंजूर न झाल्याच्या नैराश्यातून बेळगावात आज एका ठेकेदाराने टोकाचे पाऊल उचलले. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयात अधिकाऱ्यांसमोरच त्याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
होय, सरकारी काम अन सहा महिने यनाम्ब अशी एक म्हण आहे. परंतु बिले मंजुरीच्या बाबतीत सहा महिने नव्हे तर वर्षे लोटतात. त्या दरम्यान कर्ज घेऊन स्वतः गुंतवणूक करून सरकारी कामे केलेले ठेकेदार मेटाकुटीला येतात. गेंड्यांच्या कातडीच्या अधिकाऱ्यांना मात्र त्याची फिकीर नसते. अशाच मनस्तापातून एका ठेकेदाराने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयात बिल मंजूर करण्याच्या मागणीसाठी टोकाचे पाऊल उचलत विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला
कंत्राटदार नागप्पा बंगी यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बेळगावच्या किल्ला परिसरात असलेल्या कार्यालयात नागप्पा बंगी यांनी कार्यकारी अभियंता एस. एस. सोबरद यांच्यासमोर सोबत आणलेले विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सोबरद यांनी रस्ते देखभालीचे बिल मंजूर न केल्याने नागाप्पा बंगी या ठेकेदाराने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली आहे.
यावेळी तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी तत्काळ नागप्पा बंगी यांना कारमधून रुग्णालयात नेऊन उपचार करविले. सध्या नागप्पा बंगी यांची प्रकृती धोक्याबाहेर असून उपचार सुरू आहेत. या घटनेने सार्वजनिक बांधकाम खात्यात एकच खळबळ उडाली आहे.


Recent Comments