अतिक्रमणासंदर्भात भूमापन, सर्वेक्षणासाठी गेलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर ग्रामस्थांनी दगडफेक केल्याची घटना गोकाक तालुक्यातील एलपट्टी येथे घडली आहे. या दगडफेकीत आरएफओसह वनविभागाचे पाच कर्मचारी जखमी झाले असून वन व पोलीस विभागाच्या वाहनांसह खासगी वाहनांचे नुकसान झाले.
गोकाक तालुक्यातील एलपट्टी गावात अतिक्रमण केलेल्या वनजमिनीचे सर्वेक्षण करण्यासाठी वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी गेले होते. त्यांच्यावर ग्रामस्थांनी दगडफेक केली. या घटनेत गोकाकच्या आरएफओसह वनविभागाचे पाच कर्मचारी जखमी झाले. दगडफेकीत वनरक्षक वाहन, पोलिस वाहन आणि दोन खासगी वाहनांसह 10 हून अधिक दुचाकींचे नुकसान झाले.
खनगाव राखीव वनक्षेत्र सर्व्हे क्रमांक ४७७, ७१८/अ व ५८० अ येथील ५०० एकर जमिनीवर अतिक्रमण झाल्याच्या आरोपांवर सुनावणी झाली. या पार्श्वभूमीवर वनविभागाचे कर्मचारी अतिक्रमण झालेल्या जमिनीचे सर्वेक्षण करण्यासाठी गेले होते. यावेळी ग्रामस्थ आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी झाली. वाद वाढला आणि गावकऱ्यांनी दगडफेक केली. याप्रकरणी गोकाक पोलीस ठाण्यात ३० हून अधिक जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments