Belagavi

बस्तवाड ग्रापंला गांधी ग्राम पुरस्कार प्रदान

Share

बेळगाव तालुक्यातील बस्तवाड ग्रामपंचायतीने गांधी ग्राम पुरस्कार मिळवण्यात हॅट्ट्रिक केली आहे. विधानसौधमध्ये शानदार समारंभात बस्तवाड ग्रामपंचायतीला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

बंगळुरू येथे विधानसौधच्या बँक्वेट हॉलमध्ये झालेल्या शानदार समारंभात ग्रामविकास आणि पंचायत राज खात्याचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी बेळगाव तालुक्यातील बस्तवाड ग्रामपंचायतीला गांधी ग्राम पुरस्कार प्रदान केला.

यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या उपस्थितीत झालेल्या या समारंभात बस्तवाड ग्रामपंचायतीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंचायत विकास अधिकारी व सर्व सदस्यानी पुरस्कार स्वीकारला. बस्तवाड ग्रामपंचायतीला सलग तिसऱ्यांदा गांधी ग्राम पुरस्कार मिळाला आहे.

Tags: