बेळगावची कन्या महिमा रेवणकर हिने श्रीलंकेत नुकत्याच पार पडलेल्या 40 व्या आंतरराष्ट्रीय कला आणि संस्कृती परिषदेत पुरस्कार मिळवला आहे. त्याबद्दल तिचा दैवज्ञ ब्राह्मण सेवा संघातर्फे सत्कार करण्यात आला.

दैवज्ञ ब्राह्मण सेवा संघातर्फे महिमा रेवणकरचा महात्मा रोड, शहापूर येथील देवज्ञ मंगल कार्यालयात सत्कार करण्यात आला. दैवज्ञ ब्राह्मण सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.
संघाचे अध्यक्ष दयानंद नेतलकर, उपाध्यक्ष मनुनव सेठ, दैवज्ञ महिला मंडळाच्या सचिव सीमा कळवेकर, दैवज्ञ गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष गुरुप्रसाद पावसकर, सचिव मनोज कोळवेकर आदी उपस्थित होते.


Recent Comments