Belagavi

फुलबाग गल्ली युवक मंडळाकडून कुलस्वामिनी पाट पूजन

Share

लाडक्या गणरायाला निरोप दिल्यानंतर आता समस्त बेळगावकरांना आता नवरात्राचे वेध लागले आहेत. शहरातील फुलबाग गल्ली येथील स्वराज्य सेना युवक मंडळाने आज बेळगावची मानाची कुलस्वामिनीच्या पाटपुजनाचा कार्यक्रम पार पाडला.

होय, गणेशोत्सवाची धामधूम संपल्यानंतर आता बेळगावातील युवक आणि नवरात्रौत्सव मंडळांना आता आदिशक्ती दुर्गेच्या नवरात्रौत्सवाचे वेध लागले आहेत. बेळगावची कुलस्वामिनी या नावाने महिषासुर मर्दिनीची प्रतिष्ठापना करून नावारूपाला आलेल्या फुलबाग गल्ली येथील स्वराज्य सेना युवक मंडळाने आज कुलस्वामिनीच्या पाट पुजनाचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष अरुण पाटील तसेच महादेव (अमित) पाटील, संकेत मळीक, आकाश कुमार नायडू, नवजीत मळीक, अक्षय देवन, जोतिबा चौगुले, प्रणिल शिंदे, विशाल कंग्राळकर, विश्वजीत चौगुले, सुमित बिर्जे, प्रथमेश चौगुले,श्रीजित, विशाल चित्तापाचे व इतर कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Tags: