Belagavi

बेळगावात लघु उद्योग भारतीतर्फे श्री प्रभू विश्वकर्मा जयंती

Share

लघु उद्योग भारतीतर्फे पहिल्यांदाच उद्यमबाग इंडस्ट्रियल एरियामध्ये श्री प्रभू विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली. श्री विश्वकर्मा सेवा संघाच्या नेतृत्वाखाली लघु उद्योग भारतीच्या मार्गदर्शनाखाली हा समारंभ पार पडला.

या कार्यक्रमावेळी एलआयसी इंडियाचे श्रीधर उप्पीन, एल आय सी ऑफ इंडियाचे रिसोर्स पर्सन अतुल देशमुख, लघु उद्योग भारती कर्नाटकचे अध्यक्ष सचिन सबनीस, जनरल सेक्रेटरी के नारायण प्रसन्ना, लघु उद्योग भारती बेळगांवचे अध्यक्ष नितीन लेंगडे, सेक्रेटरी महेश इनामदार उपस्थित होते.

तसेच विश्वकर्मा सेवा संघाचे अध्यक्ष रमेश देसुरकर, उपाध्यक्ष बाळू लोहार, सेक्रेटरी राजू सुतार, खजिनदार संदीप मंडोळकर, सभासद नामदेव लोहार, प्रकाश कम्मार, प्रशांत बेळगावकर, गोपाळ सुतार तसेच श्री विश्वकर्मा महिला सेवा संघाच्या अध्यक्षा माधुरी सुतार, उपाध्यक्षा सोनाली मंडोळकर, सेक्रेटरी स्वाती सुतार, खजिनदार रेणुका मारुती सुतार, सभासद गीता नामदेव लोहार, संपदा बेळगावकर उपस्थित होत्या

Tags: