Belagavi

बेळगावात पर्युषण पर्वानिमित्त पालखी महोत्सव

Share

जैन धर्मियांच्या पर्युषण पर्वानिमित्त बेळगावातील मठ गल्लीतील चिक्क बस्तीपासून पालखी महोत्सव पार पडला.

जैन धर्मात आत्मशुद्धीसाठी पर्युषण पर्व साजरा केला जातो. या अंतर्गत अनंत चतुर्दशीपर्यंत पूजा-अर्चना करून आत्मशुद्धीसाठी प्रार्थना केली जाते. त्यानंतर भाद्रपद पौर्णिमेला पालखी महोत्सव साजरा केला जातो. यानुसार बेळगावातील मठ गल्लीतील चिक्क बस्तीपासून पालखी मिरवणूक काढण्यात आली. सजवलेल्या पालखीत भगवानांची मूर्ती विराजमान करून चवऱ्या ढाळीत बँड पथकाच्या साथीने भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली.

यात असंख्य श्रावक-श्राविका भक्तिभावाने सहभागी झाले होते. विविध मार्गांवरून फिरून पालखी उत्सवाची चिक्क बस्तीमध्ये सांगता झाली. त्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. आराधना महिला मंडळाच्या अध्यक्षा सुरेखा गौरगोंडा यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Tags: