Vijayapura

अज्ञातांकडून आमदार यत्नाळ यांच्या बॅनरचे नुकसान : तणावाचे वातावरण

Share

विजयपूर शहराचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांचे चित्र असलेले बॅनर अज्ञातांनी फाडून विद्रूप केल्याची घटना घडली आहे. गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देणारे विजयपूर शहरातील शिवाजी सर्कल येथे लावलेले आमदार यत्नाळ यांच्या चित्राचे मोठे बॅनर अज्ञातांनी फाडले .

याची खबर मिळताच यत्नाळ समर्थक शिवाजी सर्कलमध्ये जमा झाले. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत फाटलेले बॅनर हटवले व घटनास्थळी उपस्थित तरुणांना पांगवले. या संदर्भात एसपी ऋषिकेश सोनवणे व इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

आमदार यत्नाळ यांच्या चित्राचे बॅनर फाडणाऱ्या नराधमांना अटक करण्याची मागणी त्यांच्या समर्थकांनी केली. ते घटनास्थळी तैनात असलेल्या, पोलिस विभागाने बसवलेल्या सीसी कॅमेऱ्याचे फुटेज तपासत आहेत.

सीसी कॅमेऱ्याच्या फुटेजनंतर बॅनर फाडल्याची खरी माहिती मिळेल, अशी माहिती एसपी ऋषिकेश सोनवणे यांनी दिली आहे.

Tags: