ग्रामीण मतदारसंघातील आमदार लक्ष्मी हेब्बाळकर या आता राज्याच्या मंत्री आहेत, त्यामुळे मतदारसंघात आणखी विकासाची संधी आहे. सर्वांना विश्वासात घेऊन मतदारसंघाचा आदर्श म्हणून विकास करूया, असे विधान परिषदेचे सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी सांगितले.

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील बडाल अंकलगी गावातील शासकीय आदर्श वरिष्ठ प्राथमिक शाळेत नव्याने बांधण्यात आलेल्या अतिरिक्त शाळा खोल्यांचे उद्घाटन व हिरेबागेवाडी झोनस्तरीय प्रतिभा कारंजी व कलोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
लक्ष्मी हेब्बाळकर या संपूर्ण क्षेत्राकडे एकाच दृष्टीनं पाहत आहेत. जात, पक्ष, प्रदेश असा भेदभाव न करता सर्वांना विश्वासात घेऊन त्या काम करत आहेत. मतदारसंघातील जनता त्यांच्याकडे प्रेमाने व विश्वासाने पाहत आहे. मतदारसंघातील लोकांसह आपण सर्वजण एकाच कुटुंबातील सदस्यासारखे आहोत. आगामी काळात विकासासाठी क्षेत्रातील लोकांचा सल्ला व मार्गदर्शन आवश्यक आहे. त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन काम केले जाईल, असे चन्नराज हट्टीहोळी यांनी सांगितले.
यावेळी वेदमूर्ती श्री राचय्या अज्जा , गावातील जेष्ठ मंडळी, सिद्दू चापगाव, विठ्ठल अर्जुनवाड, मंजू अक्कनवर, बसवंत नायक, यल्लनगौडा पाटील, रमणगौडा पाटील, मुशेप्पा हट्टी , पडेप्पा अंकलगी, पिंटू, जिल्हा व तालुका विभागातील शालेय व शालेय शिक्षण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments