गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा बेळगावातील अनेक उत्सव मंडळांनी अधिक उंचीच्या गणेशमूर्ती प्रतिष्ठापित केल्या आहेत. त्यामुळे विसर्जन तलाव अपुरे पडण्याची शक्यता आल्याने मंडळांनी लवकर विसर्जन मिरवणुकीत सहभागी व्हावे आणि तशा परिस्थितीत पर्यायी विसर्जन व्यवस्थेत श्री मूर्तींचे विसर्जन करावे असे आवाहन लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने केले आहे.

आमदार अभय पाटील, माजी आमदार अनिल बेनके यांच्या नेतृत्वाखालील लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची भेट घेऊन ही समस्या निदर्शनास आणली. यावेळी झालेल्या चर्चेत अधिक उंचीच्या मूर्तींमुळे शहरात असलेले तिन्ही तलाव भरले तर किमान २०-२५ मूर्ती विसर्जन करणे कठीण होण्याची शक्यता आहे हे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. अशाप्रसंगी प्रशासनाने पूर्वतयारी करून सार्वजनिक गणेशमूर्तींच्या विसर्जनाची पर्यायी व्यवस्था करण्याची विनंती करण्यात आली. ती जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केली.
यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार अभय पाटील म्हणाले की, गेल्या 4 दिवसांपासून गणेशमूर्ती मंडळाना भेटी दिल्या आहेत. यावेळी बेळगावात गणेशमूर्तींची उंची मागील वर्षांच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे कपिलतीर्थ, जक्कीन होंड हे तीन तलाव गणेश विसर्जनासाठी अपुरे पडण्याची शक्यता असून याबाबत पर्यायी व्यवस्था आताच करण्यासाठी जिल्हाधिकारी व महापालिकेला निवेदन दिले आहे.
माजी आमदार अनिल बेनके म्हणाले की, यंदाही गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, विसर्जनासाठी सज्ज असलेल्या गणरायाच्या मूर्ती मोठ्या आकाराच्या आहेत. बेळगावात कपिलेश्वर आणि जक्किनहोंड हे तलाव भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकमान्य टिळक सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळातर्फे जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. बाइट
यावेळी लोकमान्य मंडळाचे सदस्य परमेश्वर हेगडे, विजया जाधव, सुनिल जाधव, हेमंत हावळ, रवी कलघटगी, अरुण पाटील, आदित्य पाटील आदी उपस्थित होते


Recent Comments