Belagavi

बेळगावात षोडशकरण भावना व दशलक्षण महापर्व कार्यक्रम भक्तिभावाने

Share

बेळगावातील माळमारुती वसाहतीमधील माणिकबाग दिगंबर जैन बोर्डिंगच्या प्रांगणातील श्री 1008 धर्मनाथ दिगंबर जैन मंदिरात षोडशकरण भावना व दशलक्षण महापर्व कार्यक्रम भक्तिभावाने पार पडला.

होय, गेली सलग 21 वर्षे श्री 1008 धर्मनाथ दिगंबर जैन मंदिरात षोडशकरण भावना व दशलक्षण महापर्व कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. जैन व अन्य समुदायात जैन धर्माची शिकवण आणि संदेशाचा प्रसार-प्रचार करण्याच्या हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यंदाचा हा 21व्या वर्षाचा कार्यक्रम 15 सप्टेंबरपासून सुरु झाला असून येत्या 30 सप्टेंबरला त्याची सांगता होणार आहे. या षोडशकरण भावना व दशलक्षण महापर्वानिमित्त आज मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रम पार पडले.

याबाबत अधिक माहिती देताना जैन समाजाचे नेते जी. व्ही. जिनगौडा यांनी इन न्यूजला सांगितले की, 2002 पासून आजपर्यंत सलग 21 वर्षे षोडशकरण भावना व दशलक्षण महापर्व कार्यक्रम घेण्यात येतो. यावर्षी 60 श्रावक-श्राविका सहभागी झाले आहेत. शुक्रवार 29 रोजी पालखी सोहळ्यात शहर परिसरातील अनेक श्रावक-श्राविका सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम 16 दिवसांचा आहे.
दरम्यान, आज विशेष पूजेला बेळगाव शहरातील महांतेश नगर, सदाशिवनगर, शाहूनगर, रामतीर्थनगर आदी भागातील जैन समाजाच्या भक्तांनी मंदिरात उपस्थित राहून धार्मिक विधींत भाग घेतला.

Tags: