Belagavi

रामदुर्ग तालुक्यात बस उलटून 20 विद्यार्थी जखमी

Share

वायव्य कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाची बस उलटल्याने 20 विद्यार्थी जखमी झाले. ही दुर्घटना बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील बिजगुप्पी गावात घडली.

बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील बिजगुप्पी गावात केएसआरटीसीची बसचा फाटा तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याकडील झाडाला धडकली. त्यानंतर ती उलटली. यावेळी बसमध्ये 50 हून अधिक प्रवासी होते.

त्यापैकी 20 विद्यार्थी जखमी झाले. अपघातग्रस्त बस चिकोप्प गावातून रामदुर्गकडे निघाली होती. पुढे जात असताना फाटा कट होऊन ती झाडावर आदळली. बसमध्ये अनेक विद्यार्थी होते.

ताबडतोब 108 नंबरवर संपर्क साधून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवानेच या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. कटकोळ पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.

Tags: