सर्वोच्च न्यायालय ई-समिती आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कर्नाटक न्यायालय ई-सेवा केंद्र, हेल्प डेस्क आणि व्हीसी केबिनचे आज बेळगाव जिल्हा न्यायालयाच्या नवीन संकुलात उदघाटन करण्यात आले. यामुळे वकील आणि पक्षकारांनी चांगली सोय होणार असून, त्याचा लाभ घ्या असे आवाहन प्रथम मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश एल विजयादेवी यांनी केले.

प्रथम मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश एल.विजयालक्ष्मी देवी, यांच्या हस्ते आज सकाळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सदस्य सचिव पी. मुरली मोहन रेड्डी, बेळगाव वकील संघटनेचे प्रभारी अध्यक्ष सुधीर चव्हाण आदींच्या उपस्थितीत या ईसेवा केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी जिल्हा न्यायाधीश विजयादेवी यांनी केंद्राची पाहणी करून माहिती घेतली.
यावेळी इन न्यूजशी बोलताना जिल्हा न्यायाधीश विजयादेवी यांनी सांगितले की, वापरकर्त्यांसाठी नागरिक न्यायालयीन केंद्रित सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे. वकील आणि पक्षकारांना ई-सेवा केंद्र/हेल्प डेस्क विविध सेवा पुरवण्यात येतील. त्यात न्यायालयाच्या स्थानाबद्दल माहिती, खटल्याच्या स्थितीबद्दल चौकशी हाताळणे, पुढील सुनावणीची तारीख आणि इतर तपशील, प्रमाणित प्रतींसाठी अर्जांची स्थिती मिळविण्याची सुविधा, ई-फायलिंगसाठी मदत, याचिका अँड्रॉइड आणि आयओएस प्लॅटफॉर्मसाठी ई-कोर्टचे मोबाइल ऍप डाउनलोड करण्यास मदत, कर्नाटक उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणांचा तपशील मिळवण्यासाठी आणि विविध जिल्हा न्यायालये, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून मोफत विधी सेवांचा लाभ कसा घ्यावा याबद्दल जनतेला मार्गदर्शन कण्यात येईल. त्याचा नागरिक व वकिलांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बोलताना बेळगाव वकील संघटनेचे प्रभारी अध्यक्ष सुधीर चव्हाण म्हणाले की, या केंद्रामुळे वकील आणि पक्षकारांनी चांगली सोय होणार आहे. केंद्रात ई-कोर्ट प्रकल्प अंतर्गत सेवा उपलब्ध असून, सर्व न्यायालयांशी संबंधित व्हिडिओशी कनेक्ट होण्यासाठी सर्वांना मदत होईल. याचा वकील आणि पक्षकारांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. बाईट.
यावेळी वकील, पक्षकार तसेच न्यायालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments