Belagavi

आयएएम इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटतर्फे शिक्षकदिन

Share

आयएएम इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट बेळगावच्या वतीने शिक्षकदिन पुरस्कार सोहळा पार पडला.

बेळगावातील अयोध्या फंक्शन हॉलमध्ये आयएएम इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचे संस्थापक गौडेश एस. पाटील व संचालक सौ. सौम्या पाटील यांनी संस्थेचा वार्षिक कार्यक्रम म्हणून शिक्षक दिन पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते.

यावेळी 27 हून अधिक शिक्षकांना प्रमुख पाहुणे पदवीपूर्व शिक्षण खात्याचे उपसंचालक एम. एम. कांबळे, पदवीपूर्व महाविद्यालय प्राचार्य संघटना बेळगावचे अध्यक्ष रवी एस. पाटील, गौडेश एस पाटील आणि सौ. सौम्या जी पाटील यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्याबद्दल शिक्षकांच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेचे भाव दिसून आले.

आयएएमचे गीता बसण्णावर, नारायण कामत, अंकुश घाग, रक्षिता रमेश, मिरज अफजलपुरी, राजशेखर कोल्लीमठ व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमात अन्नपूर्णेश्वरी केटरिंगने जेवण प्रायोजित केले होते.

Tags: