बेळगाव शहरात गणेश चतुर्थीनिमित्त आज पाचव्या दिवशी विविध गणेश मंडळांकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
बेळगाव शहरात गणेशोत्सवात गणेशभक्तांना महाप्रसाद वाटप करण्याची जुनी परंपरा आहे. त्यानुसार आज शहरातील उत्सवाच्या पाचव्या दिवशी विविध गणेश मंडळांकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
सदाशिव नगर गणेश मंडळ व पोस्ट अँड टेलिग्राफ कॉलनी गणेश मंडळाकडून आज गण होमासह सत्य नारायण, वरदशंकर पूजन करण्यात आले. त्यानंतर आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी विविध परिसरातील महिला व नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.


Recent Comments