बेळगाव ग्रामीण मतदार संघातील बेळगुंदी येथे ग्रामस्थ व विविध संघटनांच्या वतीने राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा रविवारी सायंकाळी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

तुमच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून तुम्ही माझा सत्कार केलात. पण प्रत्यक्षात मी तुमची खूप ऋणी आहे. तुम्ही सर्वाधिक बहुमताने मला निवडून दिल्यामुळेच आज मी राज्याची मंत्री होऊ शकले आहे. ग्रामीण मतदारसंघाचा आणखी विकास करून मी तुम्हा सर्वांची परतफेड करण्याचा प्रयत्न करेन असे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भावूक होत सांगितले आणि जनतेच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
जनतेला त्रासातून सोडविण्यासाठी आमच्या सरकारने पाच हमी योजना राबविल्या आहेत. यातून आम्ही प्रत्येक कुटुंबासोबत आहोत हे दाखवून दिले आहे. आगामी काळात आणखी कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून काँग्रेसचे सरकार हे तुमचेच सरकार असल्याची पुष्टी करू, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, सोमन्ना गावडा, युवराज कदम, मल्लेश चौगले, रमेश फर्नांडिस, फादर आग्नेल, बाळू देसुरकर, मनोहर बेळगावकर, रंजना गावडा, नारायण चव्हाण, दयानंद गावडा, भाऊ जाधव, शिवाजी बेडगेकर, सुनीता तळवार, शिवाजी पाटील, महादेव पाटील, कृष्णा गावडा, गुरुनाथ, राजू किणेकर, रहमान तहसीलदार, शिवाजी बोकडे, सुरेश किणेकर, अशोक गावडा आदी उपस्थित होते.


Recent Comments