Belagavi

चालकाचे नियंत्रण सुटून सुवर्णसौध जवळ बस पलटी , अनेक जखमी

Share

बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने , के.के.कोप्पहून बेळगाव शहराकडे येणारी शहर वाहतुकीची बस शनिवारी सकाळी सुवर्ण विधान सौधजवळ उलटली, यात कंडक्टरसह अनेक प्रवासी जखमी झाले.

या घटनेत एका मुलीच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे . बस कंडक्टर गंभीर जखमी झाली असून जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित प्रवासी किरकोळ जखमी होऊन बचावले.

माहिती समजताच हिरेबागेवाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला.

Tags: