बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी एल अँड टी कंपनीला चांगलाच शॉक दिलाय. या कंपनीला त्यांनी नियमानुसार काम न केल्याने 21 कोटींचा दंड भरण्याची नोटीस जारी केली आहे.
बेळगाव शहरात 24 तास अखंड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठीच्या पकल्पाचे सरकारने ठोस नियोजन केले असले तरी निविदा मंजूर झालेल्या कंपनीने वेळेत काम पूर्ण न करून बेजबाबदारपणा दाखवला आहे. त्याबद्दल या कंपनीला पालिका आयुक्तांनी चांगलाच शॉक दिलाय.
याबाबत महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली. बेळगाव शहरात 24 तास अखंड पिण्याच्या पाण्याचे प्रकल्प सरकारने ठोस नियोजन केले आहे. त्याचे टेंडर एल अँड टी कंपनीला मंजूर करण्यात आले होते. परंतु निविदा स्वीकारलेल्या कंपनीने काम वेळेत पूर्ण केले नाही. त्यामुळे एल अँड टी कंपनीवर ही कारवाई करण्यात आली आहे.
या कंपनीची 5 वर्षांच्या कालावधीसाठी दिलेली निविदा पुढील वर्षी 15 जून रोजी संपणार आहे. करारानुसार आतापर्यंत 60% काम व्हायला हवे होते, ते केवळ 35 ते 36% पूर्ण झाले आहे. करारातील अटींनुसार एल अँड टी कंपनीला आम्ही अकार्यक्षमता आणि वितरण धारणाधिकार करार 6 साठी 25% दंड ठोठावला आहे.
आम्ही यापूर्वीच एल अँड टीला 21 कोटी दंड भरण्याची नोटीस दिली आहे, जलवाहिनी घालण्यासाठी त्यांनी अनेक रस्ते खोदले आहेत, आम्ही त्यांना सातत्याने सूचना देत आहोत, त्यांना दिलेले टार्गेट पूर्ण करायला हवे होते.
स्मार्ट सिटी प्रकल्पांमुळे बेळगावला नवे रूप मिळाले आहे. अजून काही कामे प्रगतीपथावर असून, येत्या काही महिन्यांतच स्मार्ट सिटी प्रकल्पाचे सर्व काम पूर्ण होईल, असे ते म्हणाले. बाइट
एकंदर, शहराच्या विस्कळीत पाणी पुरवठ्यासाठी जबाबदार असलेल्या एल अँड टी कंपनीच्या कारभाराबाबत बेळगावकरांत आणि लोकप्रतिनिधींमध्येही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे आता दंड आकारल्यानंतर तरी या कंपनीचा कारभार सुधारतो का हे पहायला हवे.


Recent Comments