Belagavi

केएलएस आयएमईआरचा शनिवारी स्थापना दिन

Share

बेळगावातील कर्नाटक लॉ सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट एज्युकेशन अँड रिसर्चचा (केएलएस आयएमईआर) 33 वा स्थापना दिन येत्या शनिवार दि. 16 सप्टेंबर रोजी दुपारी 4.30 वाजता संस्थेच्या सभागृहात होणार आहे.

केएलएस आयएमईआर संचालन समितीचे अध्यक्ष आर. एस. मुतालिक यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती देऊन सांगितले की, बेळगावातील नामवंत उद्योगपती दिवंगत रावसाहेब गोगटे यांच्या वाढदिवसानिमित्त 33 वा स्थापना दिन येत्या शनिवार दि. 16 सप्टेंबर रोजी दुपारी 4.30 वाजता संस्थेच्या सभागृहात होणार आहे. याप्रसंगी बेंगळूर आयआयएमचे प्रा. आर. श्रीनिवासन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

बेळगावातील यशस्वी स्टार्टअप वायव्य लॅबचे सीईओ आणि सहसंस्थापक रवी के. पाटील यांचा यावेळी यशस्वी उद्योजक “एन्टरप्रिन्युअर ऑफ 2023” हा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे. बेळगावातील उदयोन्मुख उद्योजकांना प्रोत्साहन देणे हा त्यामागचा उद्देश आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी केएलएस संस्थेचे अध्यक्ष अनंत मंडगी असतील. प्रमुख पाहुणे म्हणून केएलएस संस्थेचे चेअरमन प्रदीप सावकार, सचिव विवेक कुलकर्णी व एस. व्ही. गणाचारी उपस्थित राहणार आहेत.

आमच्या विध्यार्थ्यांसाठी तर हा समारंभ त्यांच्या क्षेत्रातील ज्ञान घेण्याची संधीच आहे. परंतु होतकरू उद्योजक, व्यवसायिकांसाठीही एक पर्वणी आहे. त्यामुळे सर्वानी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले.
या पत्रकार परिषदेला आयएमईआरचे संचालक प्रा. अरिफ शेख उपस्थित होते.

Tags: