Belagavi

हजरत निजामुद्दीन एक्सप्रेसमध्ये 8 युवक आढळले गुंगीत

Share

वास्को-हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस ट्रेनमध्ये गोव्याहून उत्तर प्रदेशला निघालेले आठ तरुण सोमवारी रात्री गुंगीत आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. त्यांच्यावर बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रोजगारासाठी उत्तर प्रदेशातून गोव्यात आलेल्या तरुणांनी गोव्यात जेवण करून वास्को-निजामुद्दीन ट्रेनने प्रवास केला. गोव्यातील कुळे रेल्वेस्थानकाजवळ ते गुंगीत असल्याचे दिसून आल्याने खळबळ उडाली. रात्री ८.२० च्या दरम्यान, ट्रेन बेळगाव रेल्वे स्थानकावर आली असताना त्यांना बेळगाव रेल्वे पोलिसांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

8 जणांपैकी 6 युवक बेशुद्ध झाले असून दोन युवकांची परिस्थिती गंभीर आहे. हे सर्वजण उत्तर प्रदेशातील असल्याची माहिती समोर आली आहे.
ते गोव्यात काम करत होता आणि वास्को निजामुद्दीन ट्रेनने आपल्या गावी परत जात होते. जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेले तरुण उपचाराला प्रतिसाद देत आहेत. शहर पोलीस अधिकारी, रेल्वे पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली.

Tags: