बेळगावातील जिजामाता चौक, कामत गल्ली येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने यंदा स्थापनेची 111 वर्षे पूर्ण केली आहेत. त्यानिमित्त आज मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
गणेशोत्सवासोबतच विविध धार्मिक-सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या बेळगावातील जिजामाता चौक, कामत गल्ली येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या स्थापनेला यंदा 111 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त मंडळाचे कार्यकर्ते, गल्लीतील रहिवाशी यांच्या सहकार्याने आज रक्तदान शिबिर घेण्यात आले. कामत गल्लीतील स्थळ देवस्थान येथे पार पडलेल्या या शिबिरात सुमारे 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या संदर्भात इन न्यूजला माहिती देताना कामत गल्ली गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी सुमित शहापूरकर यांनी सांगितलं की, जिजामाता चौक, कामत गल्ली येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या स्थापनेला यंदा 111 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त यंदा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन मंडळातर्फे केले आहे. याआधी नागरिकांसाठी डेंग्यू रोग प्रतिबंधक लसीकरण शिबीर घेण्यात आले असून, आज रक्तदान शिबीर घेण्यात आले. यासाठी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व रहिवाशांचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.
अन्य एक कार्यकर्ते श्लोक राजू कडोलकर यांनी सांगितले की, यंदा आमच्या मंडळाला 111 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त गणेशोत्सवाआधी आणि उत्सव काळात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात डेंग्यू प्रतिबंधक लस देण्यात आली असून आज, रविवारी रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे येत्या 16 तारखेला गल्लीच्या गणपतीचा भव्य आगमन सोहळा आयोजित केला आहे. सर्व गणेश भक्तांनी यामध्ये भाग घ्यावा अशी विनंती केली.
दरम्यान कामत गल्लीतील थळ देवस्थानच्या आवारात आज सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत रक्तदान शिबीर घेण्यात आले. कामत गल्ली व परिसरातील सुमारे 50 रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले.


Recent Comments