:जीवनात यशस्वी होण्यात क्रीडा स्पर्धांचे मोठे योगदान असते असे जिल्हा शिक्षणाधिकारी एम. बी. नलतवाड यांनी सांगितले.
कर्नाटक सरकार बेळगाव जिल्हा पंचायत, शिक्षण व साक्षरता विभाग, गटशिक्षणाधिकारी कार्यालय, शारीरिक शिक्षण शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बेळगाव तालुकास्तरीय प्राथमिक आणि माध्यमिक शाळा क्रीडा स्पर्धांचा उदघाटन समारंभ नेहरू नगरातील जिल्हा क्रीडा संकुलात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी केले. यावेळी व्यासपीठावर शाळा शिक्षण अक्षरदासोग विभागाचे अधिकारी बसवराज मिलानट्टी, बेळगाव जिल्हा प्राथमिक शारीरिक शिक्षण संघाचे अध्यक्ष रमेश डीग्रज, समन्वय अधिकारी आय. डी. हिरेमठ, बेळगाव जिल्हा माध्यमिक शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आर. पी. वंटगुडी, बेळगाव तालुका महिला शारीरिक शिक्षक संघटना अध्यक्षा श्रीमती जी. पी पटेल, बेळगाव तालुका शारीरिक शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष हणमंत मास्तीहोळी, तालुका प्रधान सचिव बी. जी. हिरेमठ उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते क्रीडा स्पर्धांचे ध्वजारोहण करून झाल्यानंतर क्रीडा ज्योत देऊन पथ संंचलनाला चालना देण्यात आली.
स्वागत श्रीमती जे.पी. पाटील यांनी केले. प्रास्ताविक आर पी वंटगुडी यांनी केले. परिचय उमेश कुलकर्णी व अशोक अन्नीगिरी त्यांनी करून दिला. यावेळी विवेक पाटील, चंद्रकांत पाटील, संजीव पवार, जयसिंग धनाजी, सुधीर माणकोजी, सी. आर. पाटील, रामलिंग परीट, आर के पाटील, एस. ए. कणेरी, आर के कुलकर्णी, साधना भद्री, प्रा. ए. एस. गोडसे, ए.बी. नरसन्नावर, संजू बडिगेर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन एच.डी. मारीहाळ व एल. बी. नाईक यांनी केले. तर सचिन कुडची यांनी आभार मानले.


Recent Comments