55व्या फादर एडी स्मृती फ़ुटबाँल स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद अपेक्षेप्रमाणे सेंट पॉल्स हायस्कूलने पटकावले. सेंट पॉल्सने सडन डेथवर लव्ह डेल सेंट्रल स्कूलचा 6-5 अशा गोल फरकाने पराभव करून अजिंक्यपदावर पुन्हा एकदा नाव कोरले.
सेंटपॉल्स हायस्कूलची माजी विध्यार्थी संघटना पोलाईट्स ऑफ बेळगाव वर्ल्डवाईडने आयोजित केलेल्या आणि बिग व्हेंचर ब्रॉडबँड पुरस्कृत 55 व्या फादर एडी स्मृती नॉक आऊट पद्धतीच्या फ़ुटबाँल स्पर्धेचा अंतिम सामना आज सेंटपॉल्स हायस्कूल आणि लव्ह डेल सेंट्रल स्कूल यांच्यात झाला. कॅम्पमधील सेंट पॉल्स हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या या अंतिम सामन्यात सेंट पॉल्स हायस्कूलने सडन डेथवर लव्ह डेल सेंट्रल स्कूलचा 6-5 अशा गोल फरकाने पराभव करून अजिंक्यपदावर पुन्हा एकदा नाव कोरले. फ्लो
अंतिम सामन्यानंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभात बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्याहस्ते विजेत्या सेंटपॉल्स संघाला अजिंक्यपदाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला, तसेच अन्य संघ व खेळाडूंना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यावेळी बोलताना सेंटपॉल्स हायस्कूलची माजी विध्यार्थी संघटना पोलाईट्स ऑफ बेळगाव वर्ल्डवाईडचे अध्यक्ष डॉ. माधव प्रभू यांनी स्पर्धेच्या आयोजनाची माहिती देऊन सर्व संघानी शिस्तबद्धरीत्या आणि खिलाडूवृत्तीने स्पर्धेत भाग घेऊन ती यशस्वी केल्याबद्दल सर्व शालेय संघ आणि खेळाडूंचे अभिनंदन केले.
यावेळी लव्ह डेल सेंट्रल स्कूल संघाला उपविजेतेपदाचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे शिस्तबद्ध संघ म्हणून संत मीरा हायस्कूल, अनगोळ संघाला गौरविण्यात आले. बेस्ट अपकमिंग प्लेयर म्हणून सेंट झेवियरचा गौरव उच्चुकर, बेस्ट गोलकिपर म्हणून उजेर पठाण, बेस्ट प्लेयर म्हणून लव्ह डेलचा विकास या खेळाडूंना गौरविण्यात आले.

या प्रसंगी प्रसन्न शेट्टी, माधव प्रभू, परेश मुरकुटे, रेक्टर फादर सायमन फर्नांडिस, सेंटपॉल्सचे प्राचार्य सॅवियो एब्रो, सॅबेस्टीन परेरा, अनिकेत क्षेत्रीय, अमित पटेल आदी उपस्थित होते.


Recent Comments